Marathi News> मनोरंजन
Advertisement

निलेश साबळेला दिलं थुकरटवाडीतील कलाकारांनी बर्थडे सरप्राईज, व्हिडिओ होतोय व्हायरल, पहा पडद्यामागची धमाल

निलेश साबळेचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी सगळ्या कलाकारांनी चांगलीच मेहनत घेतल्याचं दिसून आलं.

 निलेश साबळेला दिलं थुकरटवाडीतील कलाकारांनी बर्थडे सरप्राईज, व्हिडिओ होतोय व्हायरल, पहा पडद्यामागची धमाल

मुंबई : दर सोमवारी आणि मंगळवारी छोट्या पडद्यावर साडे नऊ वाजता ''कसे आहेत सगळे, हसताय ना... हसायलाच पाहिजे...'' असं म्हणत घराघरांत आपलं स्थान मिळवणारा आपला लाडका होस्ट म्हणजेच डॉ. निलेश साबळे. पुण्यातील सासवडमध्ये राहणारा निलेश अभ्यासाबरोबरच स्वतःतील कलागुणांना खतपाणी घालतो. झी मराठी वाहिनीवरील अभिनयाची स्पर्धा ते पुढे फू-बाई-फूचा निवेदक म्हणून त्याने सगळ्यांचाच मनात घर निर्माण केलं. यानंतर 'चला हवा येऊ द्या' म्हणत त्याची गाडी सुसाट सुटली. 

वरवर जरी हे सगळं सहज-सोपं वाटंत असलं तरी अडथळ्यांवर मात करत स्वप्नपूर्तीसाठी झगडून निलेशने आज यशोशिखर गाठला आहे. नुकताच निलेशने त्याचा 35वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसानिमीत्ताने अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र निलेशचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय 

डॉ. निलेश साबळेंचा वाढदिवस चला हवा येऊ द्याच्या सेटवर मोठ्या उत्साहात पार पडला. त्याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे यातील सगळ्या कलाकारांनी निलेश साबळेकडे पार्टी मागितली आहे. त्याचबरोबर यामधल्या सगळ्या कलाकरांनी निलेशला शुभेच्छा देत केक कट करुन सेलिब्रेशन केलं आहे. 

याचवेळी स्नेहल शिदमचा देखील या मंचावर वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला आहे.. यावेळी सगळ्या कलाकारांनी धमाल मस्ती केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निलेशचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी सगळ्या कलाकारांनी चांगलीच मेहनत घेतल्याचं दिसून आलं. निलेशचा वाढदिवस आणखीनंच खास करण्यासाठी कलाकारांनी एकत्र जमतं 1-2 नव्हे तर 3 वेगवेगळे केक कट करायला सांगितले... त्यामुळे यावेळी फक्त निलेश साबळेची हवा असल्याचं या व्हिडिओमधून पहायला मिळालं.

Read More