Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नाआधीच शिबानी गरोदर? फरहानसोबतचे ते क्षण पाहून सर्व हैराण

शिबानी आणि फरहान या दोघांनीही काही वर्षांपूर्वी त्यांच्या नात्याची घोषणा केली

लग्नाआधीच शिबानी गरोदर? फरहानसोबतचे ते क्षण पाहून सर्व हैराण

मुंबई : अभिनेता फरहान अख्तर आणि गायिका, अभिनेत्री, मॉडेल शिबानी दांडेकर यांनी नुकतंच त्यांच्या प्रेमाच्या नात्याला सहजीवनाच्या वळणावर आणलं. शिबानी आणि फरहान या दोघांनीही काही वर्षांपूर्वी त्यांच्या नात्याची घोषणा केली. ज्यानंतर अनेकदा ही जोडी एकत्रच दिसली. (Farhan Akhtar Shibani Dandekar)

एकमेकांना सातत्यानं साथ देणारी हीच जोडी अखेर लग्नबंधनात अडकली. खंडाळा येथे त्यांनी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची वचनं दिली. 

लग्नसोहळा पार पडताच त्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनीच या नव्या जोडीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. 

व्हायरल होणारे हे फोटो पाहिल्यानंतर आणखी एका मुद्द्यानं लक्ष वेधलं. तो मुद्दा म्हणजे शिबानी गरोदर असल्याचा. 

शिबानी गरोदर आहे का?, अरेच्छा हीतर गरोदर आहे.... अशा अनेक कमेंट त्यांच्या या व्हारयल फोटोवर करण्यात आल्या. 

fallbacks

शिबानीनं घातलेल्या पेहरावामध्ये तिचं पोट बाहेर आलेलं दिसलं आणि या चर्चांना हवा मिळाली. ज्यामुळं काही चाहत्यांनी त्यांच्या मनातील शंका कमेंट्समधून व्यक्त केली. 

आता असं खरंच आहे का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, तूर्तास या नव्या जोडीला त्यांच्या लग्नाच्या मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. 

Read More