Marathi News> मनोरंजन
Advertisement

भाजपा नेत्या पंकजा मुंडें यांचा नवीन लूक..व्हिडिओ पाहिलात का?

 पंकजा मुंडे यांचा तयार होण्याआधीच After-Beforeअसा एक व्हिडीओ झी मराठीने पोस्ट केला आहे.  

भाजपा नेत्या पंकजा मुंडें यांचा नवीन लूक..व्हिडिओ पाहिलात का?

pankaja munde,Unch Maza Zoka : झी मराठीच्या (Zee Marathi) नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी नवनवीन आणि प्रेरणादायी कार्यक्रम घेऊन येत असते.गेली 7 वर्ष उंच माझा झोका(unch majha jhoka)  हा पुरस्कार सोहळा समाजातील  विविध स्तरात आपलं नाव उंच करणाऱ्या महिलांचा  सन्मान करणारा  असा आहे.

यंदाचं या पुरस्कार सोहळ्याचं 8वं वर्ष आहे 'मला अभिमान आहे'या ब्रीदवाक्याखाली यंदाचा पुरस्कार सोहळा पार पडतोय आपल्या कर्तृत्वाने समाजात योगदान देऊन समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल. '

उंच माझा झोका'  या पुरस्कार सोहळ्याची यंदाची खासियत काही औरच आहे कारण यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे(pankaja munde) या सोहळ्याचं निवेदन करणार आहेत.त्यांच्यासोबत अभिनेत्री क्रांती रेडकर(kranti redkar) सुद्धा या सोहळ्यात निवेदन करेल.

यातील पंकजा मुंडेंचा लुक समोर आला होता पण आता पंकजा मुंडे यांचा तयार होण्याआधीच आफ्टर बिफोर असा एक व्हिडीओ झी मराठीने पोस्ट केला आहे  ज्यात या कार्यक्रमासाठी तयार होण्याआधी पंकजा मुंडेंचा लुक आणि तयार झाल्यांनतर चा लुक असा हा व्हिडीओ आहे .  

 

Read More