Marathi News> मनोरंजन
Advertisement

नेहू- रोहूचं बिनसलं? Neha Kakkar च्या वाढदिवसाला पतीची अनुपस्थिती नात्यातील वादळावर प्रकाश टाकणारी

Neha Kakkar and Rohanpreet Singh Split Rumours :  नेहा कक्कडच्या वाढदिवसाच्या पार्टीत पती रोहनप्रीत सिंहनं हजेरी लावली नव्हती. इतकंच काय तर रोहनप्रीत सिंगनं सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसासाठी स्पेशल पोस्ट शेअर केली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांना 
आणि त्यांच्या चाहत्यांना तके विभक्त होणार अशा चर्चांची भीती वाटते. 

नेहू- रोहूचं बिनसलं? Neha Kakkar च्या वाढदिवसाला पतीची अनुपस्थिती नात्यातील वादळावर प्रकाश टाकणारी

Neha Kakkar and Rohanpreet Singh Split Rumours : बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर ही नेहमीच तिच्या गाण्यासाठी ओळखली जाते. नेहा तिच्या गाण्यांसोबत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नेहानं काल तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, तिचा पती रोहनप्रीत सिंहनं तिच्यासाठी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. त्यानंतर त्या दोघांमध्ये काही बिनसलं की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. 

नेहा आणि रोहनप्रीत हे दोघेही नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम जगजाहिर करताना दिसायचे. दरम्यान, काल पत्नी नेहाच्या वाढदिवसानिमित्तानं रोहनप्रीतनं सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. इतकंच काय तर नेहाच्या वाढदिवसाच्या पार्टीत देखील रोहनप्रीत दिसला नाही. रोहनप्रीतवर इतकं प्रेम करणाऱ्या नेहानं रोहनप्रीतशिवाय तिचा वाढदिवस कसा साजरा केला असा सवाल त्या दोघांच्या चाहत्यांना पडला आहे. खरंतर नेहानं तिच्या वाढदिवस सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत अनेक सेलिब्रिटी दिसले त्यात क्रिकेटर युजवेंद्र चहल पत्नी धनश्रीसोबत दिसला. पण नेहाचा पती रोहनप्रीत मात्र, दिसला नाही. अशात त्या दोघांमध्ये काही बिनसलं आहे का असा सवाल त्यांच्या चाहत्यांनी केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

नेहाच्या या व्हायरल झालेल्या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोवर कमेंट करत अनेक नेटकरी म्हणाले रोहनप्रीत कुठे आहे. एक नेटकरी म्हणाला, नेहाचा रोहु कुठे आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, रोहु कुठे दिसत नाही आहे नेहा. तिसरा नेटकरी म्हणाला, तुम्ही दोघं नेहमी एकत्र रहा तुम्ही एकत्र सुंदर दिसतात. आणखी एक नेटकरी म्हणाला, रोहनप्रीत तुझ्या पार्टीत नसण्याचं कारण काय हे सांगु शकशील का? कारण तुझ्या प्रत्येक गोष्टी या रोहनप्रीतशिवाय आता अर्धवट दिसतात. दुसरा नेटकरी म्हणाला, रोहु तुझ्या पार्टीत नाही. नाही त्यानं तुझ्यासाठी काही पोस्ट शेअर केली हे पाहायला थोडं वेगळं वाटत आहे. 

हेही वाचा : "तिला जरासाही अभिनय येत नाही", काम्या पंजाबीचा Sonakshi Sinha ला टोला

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, नेहा आणि रोहनप्रीतच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर नेहा कक्करच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. 24 ऑक्टोबर 2020 रोजी रोहनप्रीतसोबत नेहानं सप्तपदी घेतल्या होत्या. त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा या कधीच संपल्या नव्हत्या. ते दोघे नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. दरम्यान, त्या दोघांना एकत्र न पाहिल्यामुळे त्यांच्या सगळ्या चाहत्यांना काळजी वाटत आहे.

Read More