Marathi News> मनोरंजन
Advertisement

पतीचा 'सूरमा' सिनेमा पाहून नेहा म्हणते....

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने अलिकडेच गुपचूप लग्न करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला. 

पतीचा 'सूरमा' सिनेमा पाहून नेहा म्हणते....

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने अलिकडेच गुपचूप लग्न करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला. बेस्ट फ्रेंड अंगद बेदीसोबत ती शीख रितीरिवाजांनुसार विवाहबद्ध झाली. अलिकडेच अंगदचा सूरमा सिनेमा पाहिल्यानंतर तिने पतीबद्दल एक खास विधान केले आहे. 

सूरमा सिनेमात अंगद महत्त्वाच्या भूमिकेत

शाद अली दिग्दर्शित सूरमा सिनेमा अंगद बेदीने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. संदीप (दिलजीत दोसांझ) च्या भावाची भूमिका अंगदने साकारली आहे. हॉकीपटू संदीप सिंगच्या जीवनावर आधारित हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला.
अंगद बेदी, हा माजी क्रिकेटर बिशन सिंग यांचा लहान मुलगा असून तो रणजी खेळला आहे. त्यानंतर त्याने मॉडेलिंग आणि मग अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. अंगदने अलिकडेच आलेल्या टायगर झिंदा है सिनेमातही सलमानसोबत काम केले आहे. त्याचबरोबर पिंक सिनेमातही अंगद झळकला होता.

नेहा म्हणते की...

सिनेमाच्या स्क्रीनिंगनंतर अंगदसोबतचा फोटो शेअर करत नेहाने ट्वीट केले की, मला अंगद बेदीचा अभिमान आहे ज्याप्रकारे तू बिक्रमजीतची भूमिका साकारली आहेस. तू अभिनेता म्हणून जितका प्रामाणिक आणि विश्वासू आहे तितकाच पती म्हणूनही आहेस.

Read More