Marathi News> मनोरंजन
Advertisement

नेहा धुपियाच्या मुलीचा गोंडस फोटो पाहिलात का?

अंगद आणि नेहाच्या मुलीचं हे नाव 

नेहा धुपियाच्या मुलीचा गोंडस फोटो पाहिलात का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने दोन दिवसाअगोदर म्हणजे 18 नोव्हेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. आता नेहाने आपल्या मुलीच्या फोटोसोबतच तिचं नाव देखील सोशल मीडियावर शेअर केलं आहे. नेहाने ट्विट करून फोटो आणि नाव शेअर केलं आहे. एवढंच नाही तर तिच्या नावासोबतच एक वेगळा मॅसेज देखील नेहाने शेअर केला आहे. 

नेहा आणि अंगद यांनी आपल्या मुलीचं नाव 'मेहर' असं ठेवलं आहे. मेहर धुपिया बेदी या नावाने ही मुलगी ओळखली जाणार आहे. नेहा आणि अंगदने मुलीसाठी पर्सियन नाव ठरवलं आहे. ज्याचा अर्थ आहे 'कृपा'

नेहाने मेहरच्या पायाचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने टोज घातले आहेत. Hallo World असं यावर लिहिलं आहे. हा फोटो शेअर करताच मेहरला अनेक आशिर्वाद मिळायला सुरूवात केली आहे. 

नेहा आणि अंगद यांनी 10 मे रोजी सिक्रेट वेडिंग केलं. त्यानंतर माहिती समोर आली नेहा गरोदर असल्यामुळे हा सोहळा अगदी खाजगी होता. नेहा आणि अंगद विवाहापूर्वी एकत्र नेहाच्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते... परंतु, आपण गर्भवती असल्याचं समोर आल्यानंतर नेहानेच अंगदचं सामान घराबाहेर फेकून दिल्याचं समोर आलं होतं. या सगळ्या गोष्टी एका मुलाखतीत अतिशय खेळकर पद्धतीनं सांगत होते.

Read More