Marathi News> मनोरंजन
Advertisement

खायला मिळावं म्हणून पृथ्वी कॅफेमध्ये काम करायच्या नीना गुप्ता; बॉयफ्रेंड म्हणायचा, 'तू नोकर व्हायला आलीस...'

Neena Gupta : नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. कशा प्रकारे मुंबईत आल्यानंतर फुकटात खायला मिळावं म्हणून त्या पृथ्वी कॅफेमध्ये काम करायच्या, याविषयी त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

खायला मिळावं म्हणून पृथ्वी कॅफेमध्ये काम करायच्या नीना गुप्ता; बॉयफ्रेंड म्हणायचा, 'तू नोकर व्हायला आलीस...'

Neena Gupta : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांच्या मनात जागा केली आहे. त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीपासून खूप चढ-उतार पाहिले आहेत. त्या नेहमीच पॉडिटीव्ह राहतात आणि दुसऱ्यांना देखील इनडेपेन्डट आणि स्वातंत्र्य रहायला सांगतात. त्यांनी आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. त्यांना कोणाचीही मदत न घेता आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आता एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाविषयी सांगितलं. त्याचा उल्लेख करत त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत मुंबईत आल्यानंतर काय झालं याविषयी त्यांनी सांगितलं आहे. 

'ईटाइम्स' ला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसाविषयी सांगितलं आहे. 1981 मध्ये त्या त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत दिल्लीहून मुंबईत आल्या होत्या. त्यांच्या स्ट्रगलच्या काळाविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की 'जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा मी पृथ्वी कॅफेमध्ये भरीत बनवायची, जेणे करून मला फुकटात खायला मिळेल. दिल्लीहून मुंबईत एकटं येण्याची माझी हिंम्मत नव्हती त्यामुळे मी बॉयफ्रेंडसोबत आली होती.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यावेळी त्यांचा बॉयफ्रेंड त्यांना काय म्हणायचा या विषयी बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, 'लाज वाटू दे, मुंबईत तू नोकर बनण्यासाठी आली होती. हे सगळं करण्यासाठी आली होती.' याशिवाय त्यांनी सांगितलं की त्यांच्या एक्स बॉयफ्रेंड त्यांच्याकडे सिगरेट घेण्यासाठी पैसे मागायचा. पण मग तरी देखील त्याच्यात ही हिंम्मत आली की त्यानं थेट त्यांना लाज काढली. हे आठवण करताना त्या म्हणाल्या, 'मी सगळ्यांना सांगितलं, मला पैसे मागायला लाज वाटते, काम मागायला नाही.'

हेही वाचा : सनी देओलला लहानपणापासून आहे 'हा' आजार; अजूनही शूटिंग दरम्यान होतो त्रास

पुढे नीना गुप्ता म्हणाल्या की 'त्यामुळे त्या NSD (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) मध्ये कोणत्याही प्रकारचं काम करायच्या. आम्ही सगळं काही करायचो, लादी पुसण्यापासून सगळं काही. मी मोठी होत असताना, माझ्या आईचे विचार हे गांधीवादी होते. आमच्याकडे कोणत्याही कामासाठी नोकर नव्हते. आम्ही घरी सगळं काम स्वत: करायचो. मला कोणतंही काम करताना लाज वाटायची नाही.' दरम्यान, नीना गुप्ता या गेली 40 वर्षे चित्रपटसृष्टीत आहे. वयाच्या 64 व्या वर्षी देखील त्या चित्रपट करताना दिसतात. या वयातही त्यांचा फॅशन गेम हा ऑन पॉइंट आहे. 

Read More