Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीच्या honeymoon चे खास क्षण, पतीसोबत पोहोचली 'अशा' ठिकाणी

लग्नाच्या अनेक महिन्यांनंतरही अभिनेत्रीच्या  honeymoon चे क्षण सोशल मीडियावर व्हायरल, पतीसोबत खास क्षण चर्चेत   

अभिनेत्रीच्या honeymoon चे खास क्षण, पतीसोबत पोहोचली 'अशा' ठिकाणी

मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार नयनताराने विघ्नेश शिवासोबत लग्न केलं. (Nayanthara-Vignesh Shivan Wedding). या दोघांच्या लग्नाबाबत त्यांचे फॅन्स खूप उत्सुक होते आणि आता अखेर त्यांच लग्न झालं. नयनतारा सध्या तिच्या नवविवाहित आयुष्याचा आनंद घेताना दिसत आहेत. लग्नानंतर नयनतारा पती आणि फिल्ममेकर विघ्नेश शिवनसोबत हनीमून एन्जोय करत आहे. विघ्नेशने नयनतारासोबत एक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

विघ्नेशने आयुष्यातील खास क्षणांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये, 'काम... काम... काम..., सततच्या कामानंतर आम्ही स्वतःसाठी काढलेला वेळ! बार्सिलोना आम्ही येत आहोत...' असं लिहिलं आहे. (Nayanthara Vignesh Shivan honeymoon photo)

विघ्नेशने फोटो पोस्ट करताचं फक्त चाहत्यांनीचं नाही, तर अनेक सेलिब्रिटींनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या नयनताराचा पतीसोबत फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

लग्नानंतर नयनताराने घेतला मोठा निर्णय
नयनतारा सिनेमांमधील इंटिमेट सीनपासून दूर राहणार आहे. नयनताराने लग्नानंतर अभिनेत्यांसोबत ऑनस्क्रीन रोमँटिक सीन न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नयनतारा आगामी 'जवान' सिनेमामध्ये किंग खान म्हणजे शाहरुख खानसोबत दिसणार आहे. शाहरुख खान सिनेमांमध्ये इंटिमेट सीन्स करणं टाळतो.  त्यामुळे सिनेमात नयनतारा आणि शाहरुखचे इंटिमेट सीन नसतील. 

Read More