Marathi News> मनोरंजन
Advertisement

Cut...... दिग्दर्शकालाही ऐकली नाही अभिनेत्री; Kiss करतच राहिली आणि.... 

अभिनेत्यापाठोपाठ आता अभिनेत्री चर्चेत 

Cut...... दिग्दर्शकालाही ऐकली नाही अभिनेत्री; Kiss करतच राहिली आणि.... 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री इमरान हाशमी (Emraan Hashmi) सीरियल किसरच्या नावाने ओळखला जातो. त्याने सिल्वर स्क्रीनवर अनेक अभिनेत्रींसोबत रोमँटिक सीन दिले आहेत. मात्र एकदा असं झालं की, स्वतः इमरान हाशमी एका सीन दरम्यान प्रचंड लाजला. 

तर झालं असं की,'अजहर' च्या सेटवर दिग्दर्शक सीन शुट करतानाचा किस्सा चर्चेत आला आहे. दिग्दर्शकाने किसिंग सीन कट म्हणूनही अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) काही ऐकली नाही. ती सलग KISS करतच राहिली. यामुळे दिग्दर्शक आणि सेटवरचे अनेक लोक दंग झाले. 

इमरानला पाच वेळा करावं लागलं किस 

वास्तविक, ही गोष्ट २०१६ सालची आहे, जेव्हा इमरान हाश्मी आणि नर्गिस फाखरी यांचा 'अजहर' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'बोल दो ना जरा' गाण्याचे शूटिंग सुरू होते. या गाण्याचा एक मेकिंग व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नर्गिस आणि इमरान किसिंग सीनबद्दल बोलताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये नर्गिस फाखरी म्हणते, 'मला इमरानचे पाच वेळा चुंबन घ्यावे लागले. यासाठी मी जास्तीचे पैसे  आकारणार होते. कारण ते माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अजिबात नाही असं मला वाटू लागलं. ती पुढे म्हणते, मला माहित आहे की इम्रानला याबद्दल खूप आनंद झाला होता, जरी त्याने अशा प्रकारे अभिनय केला होता की 'अरे देवा, मला खरोखर काय होत आहे ते माहित नव्हते.' तो खरोखर लबाड आहे आणि त्याला ते आवडते.

fallbacks

कट म्हणूनही किस करत राहिली नर्गिस 

व्हिडिओ बनवताना इमरान  (Emraan Hashmi) आणि नर्गिस फाखरी यांचा किसिंग सीन दिसत आहे. दिग्दर्शक कट बोलल्यानंतरही, नर्गिसने इमरानला घट्ट पकडले आणि चुंबन घेणे सुरू ठेवले, ज्यामुळे तो क्षणभर स्तब्ध झाला. त्याचवेळी त्याच्या आजूबाजूचे क्रू मेंबर्स खळखळून हसायला लागतात.

क्रिकेटरच्या बायोपिकवर आधारित सिनेमा 

विशेष म्हणजे 'अझहर' हा चित्रपट माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनचा बायोपिक होता. यामध्ये इमरान हाश्मीने मोहम्मद अझरुद्दीनची भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे नर्गिस फाखरी संगीता बिजलानीच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटाचे दिग्दर्शन टोनी डिसूझा-अँथोनी डिसूझा यांनी केले होते. या चित्रपटात प्राची देसाई देखील होती. 2016 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट खूप आवडला होता.

Read More