Marathi News> मनोरंजन
Advertisement

Naga Chaitanya आणि Sobhita Dhulipala अफेअरवर समंथाची रिअ‍ॅक्शन आली समोर

नागा चैतन्य पुन्हा प्रेमात पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Naga Chaitanya आणि Sobhita Dhulipala अफेअरवर समंथाची रिअ‍ॅक्शन आली समोर

मुंबई : साऊथ स्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा प्रभूचा (Samantha Prabhu) काही महिन्यांपूर्वीचं घटस्फोट झाला होता. या घटस्फोटानंतर आता नागा चैतन्य पुन्हा प्रेमात पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला अफेअरमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. नागा चैतन्यच्या अफेअरच्या वृत्तावर आता समंथा प्रभूने मौन सोडले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा प्रभूला (Samantha Prabhu) घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या (Sobhita Dhulipalab) प्रेमात पडलाय. शोभिता धुलिपाला ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. दरम्यान शोभिता नागासोबत त्यांच्या नवीन घरात दिसली होती. तेव्हापासून या दोन स्टार्सच्या अफेअरच्या बातम्यांना व चर्चांना ऊत आले आहे.  

समंथा पोस्टमध्ये काय म्हणाली? 

समंथाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ही पोस्ट अभिनेत्रीने रणवीर सिंगच्या प्रोफाईलवरून घेतलेली आहे. 'दु:ख प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे आयुष्यात मला विनोद करायला आवडतो, मला त्यामुळे हदय हलके झाल्यासारख वाटतं, असे तिने लिहिले आहे. समंथाने ही पोस्ट अशा वेळी शेअर केली आहे, ज्यावेळेस नागा चैतन्यच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. त्यामुळे अभिनेत्रीची ही पोस्ट नागा चैतन्यच्या अफेअरच्या बातम्यांशी जोडली जात आहे.

Read More