Marathi News> मनोरंजन
Advertisement

Munmun Dutta : बबीता जीने शेअर केला डान्स व्हिडिओ, चाहत्यांना लावलं वेड

केवळ एका शोमुळे मुनमुन दत्ता आज घरोघरी प्रसिद्ध झाली आहे. लोक तिला मुनमुन दत्ता म्हणून कमी पण बबिताजींच्या नावाने जास्त ओळखतात.

Munmun Dutta : बबीता जीने शेअर केला डान्स व्हिडिओ, चाहत्यांना लावलं वेड

Munmun Dutta Dance Video : केवळ एका शोमुळे मुनमुन दत्ता आज घरोघरी प्रसिद्ध झाली आहे. लोक तिला मुनमुन दत्ता म्हणून कमी पण बबिताजींच्या नावाने जास्त ओळखतात. तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिता जीच्या प्रत्येक कृतीने जेठालाल प्रभावित होतो. परंतु मुनमुन दत्ताच्या शैलीचे लाखो चाहते आहेत. त्यातली प्रत्येक गोष्ट त्यांना वेड लावते.

munmun ने शेअर केला नवा व्हिडिओ 

अभिनेत्री मुनमुन दत्ताने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती धमाल डान्स करताना दिसत आहे. तिने अतिशय स्टायलिश पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. ती जबरदस्त स्टाइलने डोलताना दिसतेय. बबिता जी 'राजा बनके आना रे, मोह लेके जाना रे' या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

याआधीही मुनमुन दत्ताने अनेकवेळा व्हिडिओ शेअर केले आहेत. मुनमुन डान्स अॅडिक्ट आहे, त्यामुळे ती ट्रेडिंग रील्सवर मजेदार व्हिडिओ बनवून शेअर करत असते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@mmoonstar)

तारक मेहता का उल्टा चष्माची बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता तिच्या स्टाइलमुळे खूप चर्चेत असते. बबिता जी शोमधील तिच्या भूमिकेइतकीच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे आणि या स्टाइलमुळे ती चर्चेत राहिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@mmoonstar)

34 वर्षीय मुनमुन दत्ताचे अद्याप लग्न झालेले नाही आणि ती सध्या तिचे आयुष्य खूप एन्जॉय करत आहे. तारक मेहता का उल्टा चष्माच्या आधीही ती काही मालिकांमध्ये दिसली होती, पण या शोमधून तिला हवी तितकी लोकप्रियता मिळाली नव्हती.

Read More