Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aryan Khan ला वाचवण्यासाठी रचलेल्या खेळात, शाहरुखची मॅनेजरचं फसली !

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला आहे.

 Aryan Khan ला वाचवण्यासाठी रचलेल्या खेळात, शाहरुखची मॅनेजरचं फसली !

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला आहे. त्यानंतर मन्नतवर शाहरुख सह संपुर्ण खान कुटुंबाने मुलगा घरी परतल्याचा आनंद व्यक्त केला. या प्रकरणात शाहरुखच्या वकिलांसह त्याची मॅनेजर पुजा दललानीने खूप मेहनत घेतली. आर्यन NCB च्या कोठडीत असताना पुजा बऱ्याचदा ऑफिसमध्ये फेऱ्या मारताना दिसली. 

त्यात काही दिवसांपूर्वी आर्यन खानच्या अटकेसाठी पंच म्हणून समोर आलेला किरण गोसावीच्या बाबतची मोठी माहिती समोर आली. किरण गोसावीने आर्यन खानच्या सुटकेसाठी कोटींची डील केल्याचं त्याच्या बॉडीगार्डने उघड केलं होतं. त्यानंतर किरण गोसावीला अटक करण्यात आली.

सोबतच किरणच्या बॉडीगार्डने पुजा दललानी सोबत ही डील होत असल्याचं ही उघड केलं. सोबतच 50 लाखांची रक्कम किरण गोसावीला एका अज्ञात व्यक्तीने पाठवल्याचं ही त्याने सांगितलं.  या रक्कमेतून 38 लाख परत करण्यात आले होते. उर्वरित रक्कम किरण गोसावी यांनी स्वत: कडे ठेवल्याचं बॉडीगार्डने सांगितलं.

fallbacks

पण आता पोलिसांनी पुजा दललानी हिला चौकशीसाठी बोलावलं आहे. तिला समन्स पाठवण्यात आला आहेत. पण पुजाने प्रकृती ठिक नसल्याचं कारण देत आणखीनं काही वेळ मागितला आहे.  त्यामुळे आज ती चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचं समजतंय. मुंबई पोलिसांच्या एसआयटी टीमकडून समन्स मागवण्यात आला आहे. 

fallbacks

लोअर परळमध्ये गोसावीसोबत पुजाची डील झाल्याचा दावा आहे. पुजाने गोसावीला 50 लाख दिल्याचा सॅम डिसुझाने दावा केला आहे. पुजा दललानीची CCTV क्लीप मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे. 

 

 

 

Read More