Marathi News> मनोरंजन
Advertisement

'टीकटॉक'प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून कारवाई

'टीकटॉक'प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता एजाज खानला गुरुवारी अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांविरोधात टीकटॉक व्हिडिओ करत त्यात पोलिसांविरोधातच आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. एजाजला यापूर्वीही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

काही दिवसांपूर्वी टीकटॉकच्या '०७ ग्रुप'ने तरबेज अन्सारी मॉब लिचिंगप्रकरणी वादग्रस्त व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमधील आरोपींचं एजाजनं समर्थन केलं होतं. इतकंच नाही तर त्याने, सायबर सेलप्रकरणी गुन्हा दाखल असणाऱ्या फैजू या व्यक्तीचंही समर्थनही केलं होतं. त्यानंतर त्याच्यासोबत व्हिडिओ बनवत एजाजने मुंबई पोलिसांची खिल्ली उडवली.

टीकटॉक अॅपवर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात यावी असं एजाजचं म्हणणं आहे. तसंच फैजू आणि त्याच्या टीमने कोणतंही चुकीचं काम केलं नसून, त्यांनी केवळ त्यांच्या व्हिडिओ पोस्ट केल्या आणि लोकांनी मात्र ते मुस्लिम असल्याचं म्हणत आणि हा व्हिडिओ देशाच्यादृष्टीने घातक असल्याची बाब आपल्याला खटकल्याचं त्यांने म्हटलंय.

Read More