Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आम्ही दोघी' या सिनेमाचा हटके ट्रेलर

आम्ही दोघी या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. 

'आम्ही दोघी' या सिनेमाचा हटके ट्रेलर

मुंबई : आम्ही दोघी या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. 

आम्ही दोघी या सिनेमांत प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे आहे. या दोघींच्या त्यांच्या वाटा वेगळ्या पण मार्ग एकच आहे.  विचार वेगळे पण आवड एकच.. त्या वेगळ्या, पण तरीही एकच.. ही कथा आहे अमला आणि सावित्री सरदेसाई या दोघींची. 

या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील सावित्री म्हणजेच प्रिया बापट तीन वेगवेगळ्या रुपांत आपल्याला भेटणार आहे. तीन वेगळ्या वयोगटांतील तिची ही रूपं फार मोहक आहेत. ‘एकदा वाटलं ना की करून टाकायचं, मग हळहळ वाटत नाही,’ असे ती अमला म्हणजे मुक्ता बर्वेला सांगते. टीजरमधून समोर येणाऱ्या संवादातून तिचे व्यक्तिमत्व उलगडत जाते. अमलाचे व्यक्तिमत्वही तिच्या दोन-चार छटांमधून समोर येते आणि हा सिनेमा ‘हट के’आहे, असे वाटते.

‘आम्ही दोघीं’ मधील दोघींची. येत्या १६ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचे पहिले टीझर प्रदर्शित झाले आहे. टीझर पाहताना त्यांच्यातील वेगळेपणही अधोरेखित होते. त्यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच ताणली जाते.

Read More