Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुक्काबाज फेम अभिनेता Vineet Kumar Singh लग्नबंधनात अडकला

खासगीपद्धतीने विवाह सोहळा पार 

मुक्काबाज फेम अभिनेता Vineet Kumar Singh लग्नबंधनात अडकला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विनीत कुमार सिंह नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. बऱ्याच दिवसांपासून विनीत गर्लफ्रेंड रुचिरा गोरमरेला डेट करत आहे. त्याने 29 नोव्हेंबर रोजी अगदी खासगी विवाह केलं आहे. याचा फोटो आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे.

विनीतने दोन लग्नाचे फोटो शेअर करत सुंदर पोस्ट लिहिली आहे. 'तुझा हात धरून मी इथपर्यंत आलो. तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. @ruchiraagormaray प्रेम आणि आशीर्वादांसाठी तुम्हा सर्वांचे आभार... ' अशी पोस्ट लिहिली आहे. 

विनीतने वयाच्या 21 व्या वर्षी 2002 मध्ये' पिटा' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी 'मैं खुली', 'जन्नत', 'गँग्स ऑफ वासेपूर' मध्ये काम केलं आहे. गँग्स ऑफ वासेपूरमधील त्याच्या कामाचे कौतुक झाले होते पण मुक्काबाज हा चित्रपट विनीतच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. मुक्काबाजनंतर गोल्ड, सांड की आंख, आधार आणि गुंजन सक्सेना सारख्या सिनेमात दिसला.  

कोण आहे विनीतची पत्नी रूचिरा?

रूचिरा वाजवुयाने 'बँड बाजा बारात' सिनेमातून डेब्यू केलं आहे. तसेच तिने दिग्दर्शक इम्तियाजसोबत एका शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलं आहे. रूचिरा, नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत "चुडियाँ' सिनेमात दिसली. सिनेमात येण्या अगोदर तिने मुक्काबाज सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. 

Read More