Marathi News> मनोरंजन
Advertisement

अंबानी कन्येने असा निवडला गाण्यावर ठेका धरुन नवऱ्याची तक्रार करण्याचा मार्ग

देशातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांमध्ये गणल्या जाणाऱ्या अंबानी कुटुंबाची बात काही औरच. आलिशान आणि तितक्याच सुरेख जीवनशैलीसाठी हे कुटुंब ओळखलं जातं. अंबानी कुटुंबाची लाडाची लेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशा अंबानीनंही फार कमी वयातच कुटुंबाच्या पावलावर पाऊल ठेवत व्यवसाय जगतामध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली. 

अंबानी कन्येने असा निवडला गाण्यावर ठेका धरुन नवऱ्याची तक्रार करण्याचा मार्ग

मुंबई : देशातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांमध्ये गणल्या जाणाऱ्या अंबानी कुटुंबाची बात काही औरच. आलिशान आणि तितक्याच सुरेख जीवनशैलीसाठी हे कुटुंब ओळखलं जातं. अंबानी कुटुंबाची लाडाची लेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशा अंबानीनंही फार कमी वयातच कुटुंबाच्या पावलावर पाऊल ठेवत व्यवसाय जगतामध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली. 

आनंद पिरामल याच्याशी ईशानं काही वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. लग्नसोहळ्यासाठी ईशानं सुरेख पेहरावाला प्राधान्य दिलं होतं. इतकंच नव्हे, तर ईशानं तिच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेतला होता. (Isha Ambani)

एका वळणावर ईशा स्टेजवर चक्क हिल्स उतरवून बेफाम नाचताना दिसली. त्याचवेळी तिनं बॉलिवूड चित्रपटातील गाणं आणि आपल्या नृत्याच्या बळावर म्हणे सासरच्यांकडे गोड अंदाजात पतीची तक्रारही केली होती. 

ईशाचं हे रुप पाहणाऱ्यांसाठी फारच नवं होतं. लग्नाआधी साधारण काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या संगीत सोहळ्यात तिचा हा अंदाज दिसून आला. अंबानी कुटुंबानं ईशाच्या संगीत सोहळ्यासाठी राजस्थानातील उदयपूरमधील उदयविलास बुक केलं होतं. 

ईशानं संगीतसोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी 'मुंडा थोडा ऑफबीट है' हे गाणं निवडलं होतं. आनंद पिरामल याची खोड काढत माहोल आनंददायी करण्यात ईशा यशस्वी ठरली होती. परफॉर्म करताना तिच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा होता. 

सोशल मीडियावर अंबानी कुटुंबातील या विवाहसोहळ्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या. अंबानी कुटुंबानं या लग्नसोहळ्यामध्ये डोळे दीपतील अशाच पद्धतीनं सर्व व्यवस्था केल्याचं पाहायला मिळालं होतं. देशातील बहुचर्चित विवाहसोहळ्यांपैकी हा एक होता, असं म्हणायला हरकत नाही. 

Read More