Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sing and Drive मुळे ट्रोल झालेल्या मुग्धा-प्रथमेशचा कारमधील आणखी एक Video Viral

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Shares Video after Trolling : मुग्धा आणि प्रथमेशला ड्राईव्ह करण्यावरून आधी ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आता गाडीतला एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Sing and Drive मुळे ट्रोल झालेल्या मुग्धा-प्रथमेशचा कारमधील आणखी एक Video Viral
Updated: Oct 18, 2023, 02:10 PM IST

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Shares Video after Trolling : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेत होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही कोणत्या व्हिडीओ विषयी बोलतोय. तर मुग्धा आणि प्रथमेश यांनी गाडी चालवत असताना गातानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे त्या दोघांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. 

मुग्धानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओत ते दोघेही गाडीत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी मुग्धा ही गाडी चालवत असताना कॅमेऱ्यात पाहून गाणी गात होती. त्या दोघांची ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना पटलेली नाही. नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना खडे बोल सुनावले. तर अनेकांनी त्यांना गाडी चालवत असताना असा व्हिडीओ न करण्याचा सल्ला दिला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी केली स्तुती 

आता त्या दोघांनी ट्रोल झाल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, या वेळी त्यांनी गाडी चालवताना नाही तर गाडी थांबवून हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत ते दोघे गाणं गाताना दिसत आहेत. या व्हिडीओत त्यांनी त्या दोघांच्या दिवाळी विशेष कार्यक्रमां विषयी सांगितले आहे. त्यांना गाडी चालवताना पाहून नेटकऱ्यांनी त्यांची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'छान ! गाडी एका जागी थांबवून हे गाणं केल्याबद्दल धन्यवाद.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुम्ही दोघं गाडी चालवताना विडिओ शूट करू नका, हे धोकादायक आहे... गाडी चालवण्यावर लक्ष ठेवा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'असेच मस्त गात रहा.....प्रवास करत रहा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'गाडी थांबवून म्हटलेलं हे चांगल दिसतय.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'आता कसं गाडी एका जागी थांबून गाणं गात आहात.. पुन्हा चुक करू नका.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'गुणी आहातच... गाडी थांबवून गाणं म्हटलंत... तुम्ही दोघेही आमच्या हृदयाच्या पास आहात.'

लग्नाची अशी केली घोषणा 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुग्धा आणि प्रथमेशनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'आमचं ठरलंय' असं सांगत त्यांच्या लग्नाविषयी सांगितलं. त्या दोघांनी दिलेल्या या गोड बातमीनं त्यांच्या चाहत्यांना फार आनंद झाला. लग्नाची माहिती देताच त्यांचे केळवण देखील झाले.मात्र, त्या दोघांनी लग्नाची तारिख अजून कळवलेली नाही.