Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाहिली का MS Dhoniची एक्स गर्लफ्रेंड ; जाणून घ्या एका फोटोशूटनं का आलीये चर्चेत

आलेली ही सुंदरा आता पुन्हा प्रकाशझोतात आलीये.   

पाहिली का MS Dhoniची एक्स गर्लफ्रेंड ; जाणून घ्या एका फोटोशूटनं का आलीये चर्चेत

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी (Raai Laxmi)कायमच तिच्या ग्लॅमरस रुपामुळं सर्वांना घायाळ करत असते. दर दिवशी एखादा नवा फोटो किंवा एखाद्या नव्या इन्स्टा स्टोरीमुळं ती सातत्यानं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच डॉल्फिनसोबत धमाल करत चर्चेत आलेली ही सुंदरा आता पुन्हा प्रकाशझोतात आलीये. 

निमित्त ठरतंय ते म्हणजे तिच्या नव्या फोटोशूटचं. 

दाक्षिणात्य कलाजगतामध्ये ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत राय लक्ष्मीचंही नाव घेतलं जातं. तिच्या अदा आणि त्यात घायाळ करणारी एक नजरही भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देते. 

फिटनेसच्या बाबतीतही ती मागे नाही. विविध प्रकारच्या फॅशन ट्रेंड्सना ट्राय करण्यात राय लक्ष्मी आघाडीवर. 

राय लक्ष्मी चर्चेत असण्याचं आणखी एक कारण म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार, महेंद्रसिंह धोनी याच्या एक्स गर्लफ्रेंड्सच्या यादीत तिचंही नाव घेतलं जातं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi)

सहासा या मुद्द्यावर फार चर्चा होत नाही. पण, जेव्हा हा विषय निघतो तेव्हा मात्र त्याला तितकेच फाटे फुटतात हेही खरं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi)

राय लक्ष्मी आणि माहीमध्ये सध्या कोणतंच नातं नाही, पण एकदा वाव मिळालेल्या या चर्चांना थांबवणंही कठीणच... नाही का ?

 

Read More