Marathi News> मनोरंजन
Advertisement

ही मराठमोळी अभिनेत्री साकारणार राजमाता शिवगामीची भूमिका

कोण आहे ही अभिनेत्री 

ही मराठमोळी अभिनेत्री साकारणार राजमाता शिवगामीची भूमिका

मुंबई : बाहुबली : द बिगिनिंग, बाहुबली : द कनक्लूजन या सिनेमात राजमाता शिवगामीच्या भूमिकेने सगळ्यांचच लक्ष वेधल. या कॅरेक्टरची खूप चर्चा झाली. आता याच शिवगामीचा नेमका जीवनप्रवास एका वेगळ्या रूपात आपल्याला अनुभवता येणार आहे. 'बाहुबली : बिफोर द बिगिनिंग' या वेब सिरीजच्या माध्यमातून. सध्या चर्चेत असलेल्या वेब सिरीजमधील नेटफ्लिक्सच्या जगात आता ही नवी वेब सिरिज येणार आहे. या शिवगामीची तरूणपणीची भूमिका एक मराठमोळी अभिनेत्री साकारणार आहे. 

शिवगामीच्या या भूमिकेत आपल्याला मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसणार आहे. शिवगामीची तरूणपणातील भूमिका मृणाल साकारणार आहे. या वेब सिरिजमध्ये मृणालसोबत राहुल बोस, अतुल कुलकर्णी यांची देखील प्रमुख भूमिका असणार आहे. 

मृणाल ठाकूर ही मराठमोळी अभिनेत्री असली तरीही तिने हिंदीमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. कुमकुम भाग्य या लोकप्रिय मालिकेत मृणालने बुलबुलची भूमिका साकारली आहे. तसेच तिने अनेक हिंदी मालिकेत आणि मराठी सिनेमांमध्ये देखील काम केली आहेत. मृणाल सुपर 30 या आगामी सिनेमात हृतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.  

Read More