Marathi News> मनोरंजन
Advertisement

"चीनमध्ये तळलेले किडे खाल्ले अन्...", अभिनेत्री Mrinal Kulkarni यांनी सांगितला 'तो' अनुभव

Mrinal Kulkarni : मृणाल कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत त्यांचा चीनला फिरायला गेल्यानंतर आलेला हा अनुभव सांगितला होता. त्यांना देखील अनेकांनासारखाच विचित्र अनुभव आला होता. 

Mrinal Kulkarni : आपण कधी कुठे फिरायला गेलो की तिथलं लोकल फूड खाण्यास पसंती देतो. मग ते दुसऱ्या राज्यात असो किंवा दुसऱ्या देशात. पण तिथेही आपण आपल्या सवयीनुसार खाऊ याकडे लक्ष देतो. तर काही लोक नक्की काय पदार्थ आहेत हे कळत नाही म्हणून बऱ्याचवेळा काही तरी भलतंच खाऊन जातात. असं एका सर्वसाधारण व्यक्तीसोबत होणं हे सामान्य आहे असे आता अनेकांना वाटेल, पण हे कधी कोणत्या सेलिब्रिटीसोबत झालं हे ऐकूण तुम्हाला आश्चर्य होईल. पण हे सत्य आहे. असा प्रकार लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत घडला होता. याविषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

मृणाल कुलकर्णी या नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मृणाल यांचा काल वाढदिवस होता. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मृणाल यांना अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मृणाल यांनी देखील परदेशात गेल्यानंतर असचं काही केलं. मृणाल यांनी त्यांचा हा अनुभव एका मुलाखतीत सांगितला होता. मृणाल यावेळी मुलाखतीत म्हणाल्या, “काही वर्षांपूर्वी मी, विराजस आणि विराजसचे बाबा असे आम्ही चीनला फिरायला गेलो होतो. तिथे खूप इंटरेस्टिंग पदार्थांची नावं दिसत होती, पण ते नक्की काय असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आम्हाला काही तळलेले किडे मिळाले. त्याची चव फार छान होती पण त्याचं जे वर्णन होतं ते ऐकल्यावर काही खाण्याची शक्यता नव्हती." 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : “रिक्षावाल्याने शिवीगाळ केली' मग 'या' अभिनेत्रीने भर रस्त्यात दाखवला मराठमोळा हिसका

मृणाल यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी सोन परी म्हणून प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांचा जन्म हा पुण्यात 21 जून 1971 रोजी झाला होता. मृणाल यांचे सगळे शिक्षण हे पुण्यातच झाले. तर मृणाल यांनी वयाच्या 16 व्या वर्षी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यांच्या पहिल्या मालिकेचे नाव 'स्वामी' असे होते. इतक्या लहानवयात छोट्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर मृणाल यांना सुरुवातीला अनेक लोक रमाबाई या नावानं ओळखायचं. रमाबाई म्हणून ओळख असण्याचं कारण म्हणजे  'स्वामी' या मालिकेत त्यांनी पेशवे माधोराव यांच्या पत्नी रमाबाई पेशव्या यांची भूमिका साकारली होती. पण आजही लोक त्यांना   सोन परी या नावानं ओळखतात.

Read More