Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रसिद्ध मराठमोळ्या मॉडेलनं बांधली लग्नगाठ; पाहा कोण आहे नवरदेव?

Manasi Moghe Marriage: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री आणि मॉडेल मानसी मोघे हिची. मानसीनं सुर्या शर्मा ह्याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. सध्या तिनं आपले फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

प्रसिद्ध मराठमोळ्या मॉडेलनं बांधली लग्नगाठ; पाहा कोण आहे नवरदेव?

Manasi Moghe Marriage: काही दिवसांपुर्वी अभिनेत्री सुरूची अडारकर हिनं अभिनेता पियुष रानडेसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्याची बरीच चर्चा रंगलेली होती. आता एका प्रसिद्ध मॉडेलनंही गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल मानसी मोघे हिनं अभिनेता सुर्या शर्मा ह्याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. यावेळी तिनं आपल्या लग्नाचे खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून तिनं हे फोटो शेअर केले आहेत. मानसी मोघे ही लोकप्रिय मॉडेल आहे. सोबतच तिनं मराठी चित्रपटांमधूनही कामं केली आहेत. तिनं 'बुगडी माझी सांडली गं' तसेच 'ऑटोग्राफ' अशा लोकप्रिय चित्रपटांतून कामं केली आहेत. 'बुगडी माझी सांडली गं' या चित्रपटात तिनं कश्यप परूळेकरसोबत स्क्रीन शेअर केली होती. 

सोबतच तिनं ख्वाबों के परींदे या वेबसिरिजमधूनही काम केले आहे. मानसी मोघे ही मिस दिवा 2023 आहे. सुर्या देखील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानंही ओटीटीवरील अनेक वेबसिरिजमधून अभिनय केला आहे. अनदेखी, हॉस्टेजेस, ये काली काली आंखें अशा काही लोकप्रिय वेबशोमध्ये तो झळकला आहे. यावेळी अनेक लोकप्रिय सेलिब्रेटींनी त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यावेळी सिद्धार्थ चांदेकर, कपिल शर्मा, शाईशा शिंदे, शोभिता धुलिपाला अशा काही लोकप्रिय सेलिब्रेटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा : ऑनस्क्रीन सासूबाईंसोबत रिंकूचा क्यूट फोटो; म्हणाली, 'माझं लग्न झालेलं नाही पण सासू पाहिजेल तर अशी'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी तिनं पारंपारिक पद्धतीनं आपला विवाहसोहळा पार पडला. यावेळी तिनं सुंदर अशी लाल रंगांची साडी नेसली आहे. त्यावर आकर्षक सोन्याचे दागिने घातले आहेत. यावेळी सुर्यानं पांढऱ्या रंगांची शेरवानी घातली असून त्यावर लाल रंगाची शाल घेतली आहे. शालीवर सुंदर असे नक्षीकामंही आहे. यावेळी तिनं फेटा घातला असून डोळ्यावर गोगल घातला आहे. दोघांच्याही लुकची सध्या जोरात चर्चा आहे. यावेळी सुर्यानं इन्स्टाग्रामवर आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यानं दोन फोटो शेअर केले असून त्यानं कॅप्शन दिलं आहे की 'फोरएव्हर माईन.' सध्या त्यांच्या या फोटोवरती नेटकऱ्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. 

Read More