Marathi News> मनोरंजन
Advertisement

इम्रान हाश्मीसोबत अफेअर असलेल्या अभिनेत्रीचा MMSलीक, बदनामीच्या भीतीने केलं 'हे' काम

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वत:चा ठसा उमटवला आहे. 

इम्रान हाश्मीसोबत अफेअर असलेल्या अभिनेत्रीचा MMSलीक,  बदनामीच्या भीतीने केलं 'हे' काम

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वत:चा ठसा उमटवला आहे. त्याच्यासाठी काहीही साध्य करणं कठीण नाही हे त्यांनी सिद्ध केलं आहे. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीत काही लोक असे आहेत. जे स्वतः काही करू शकले नाहीत. त्यामुळे ते बातम्यांचा एक भाग राहतात. दरम्यान, असे काही लोक आहेत जे आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहतात आणि या प्रकरणामुळे त्यांचं करिअरही धोक्यात आलं आहे. आज आपण एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने स्वतःच्या बळावर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. आम्ही बोलतोय अभिनेत्री अलीशा खानबद्दल

बॉयफ्रेंडने केला mms लीक
या सर्वांशिवाय एक असा वाद निर्माण झाला ज्याने अलीशा खानचं आयुष्यच बदलून टाकलं. अलिशाच्या बॉयफ्रेंडने तिचा खासगी व्हिडिओ व्हायरल केला. आणि या भितीपोटी अलीशाने कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना हे आवडलं नाही अलिशाने हे करू नये अशी त्यांची इच्छा होती. त्यामागे बदनामीचे कारण होतं. अलिशा एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिला घराबाहेर काढलं आणि अभिनेत्री रस्त्यावर आली.

यासोबतच तिने काही चित्रपटही केले, पण तिला यश मिळवता आलं नाही. यश न मिळण्यामागचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून तिचं वादग्रस्त विधान आहे. अभिनेत्रीने वादांमुळे आपलं करिअर पणाला लावलं आणि आता अभिनेत्रीचं करिअरही बरबाद झालं आणि तिला तिच्या घराच्यांनीही घराबाहेर काढलं त्यामुळे अभिनेत्रीची परिस्थिती सध्या बिकट आहे.

अभिनेत्री अलिसा खानचा जन्म 27 डिसेंबर 1990 रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये झाला होता. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. अलिसा खानने 2010 मध्ये 'माय हसबंड-वाईफ' चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यानंतर 2017 मध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनच्या 'मात्र' चित्रपटात काम केलं. अभिनेत्री अलिसा खानने काही मोजक्याच बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे पण अलिसा खान इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवू शकली नाही.

Read More