Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : चार महिन्यांपासून बेपत्ता कॉमेडियन सिद्धार्थ अखेर आला समोर!

द कपिल शर्मा शो, कॉमेडी सर्कस फेम कॉमेडियन सिद्धार्थ सागर हा गेल्या चार महिन्यांपासून गायब असल्याचं नुकतंच सोशल मीडियातून समोर आलं होतं... त्यानंतर सिद्धार्थनं एक सेल्फी व्हिडिओ आपल्या चाहत्यांशी शेअर करत आपण सुरक्षित स्थळी असल्याचं म्हटलंय. 

VIDEO : चार महिन्यांपासून बेपत्ता कॉमेडियन सिद्धार्थ अखेर आला समोर!

मुंबई : द कपिल शर्मा शो, कॉमेडी सर्कस फेम कॉमेडियन सिद्धार्थ सागर हा गेल्या चार महिन्यांपासून गायब असल्याचं नुकतंच सोशल मीडियातून समोर आलं होतं... त्यानंतर सिद्धार्थनं एक सेल्फी व्हिडिओ आपल्या चाहत्यांशी शेअर करत आपण सुरक्षित स्थळी असल्याचं म्हटलंय. 

सिद्धार्थनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत त्यानं आपण आपल्या कुटुंबीयांमुळे गेले चार महिने अज्ञातवासात असल्याचं म्हटलंय. आपल्या कुटुंबीयांनी आपल्याला मानसिक रुपात छळल्याचंही त्यानं सांगितलंय. 

'माझे मित्र आणि मीडियाची चिंता पाहून मी हा व्हिडिओ पोस्ट करतोय. मी माझ्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली होती कारण ते लोक माझी मानसिकरित्या छळवणूक करत होते. पण सध्या मी जिथे आहे तिथले लोक मला मदत करत आहेत. आत्ता मी काही जास्त सांगू शकत नाही.... पण येत्या एक दोन दिवसांत मी मीडियासमोर येऊन सगळं काही सांगेन' असं सिद्धार्थनं या व्हिडिओत म्हटलंय. 

right now im in safe hands ...will update you guys in 2-3days

A post shared by Sidharth Sagar (@sidharthsagar.official) on

कपिल शर्माच्या कॉमेडी शो द कपिल शर्मा शो मध्ये सेल्फी मौसी या भूमिकेत दिसणारा प्रसिद्ध कॉमेडियन सिद्धार्थ सागर गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे समोर आलं होतं. सोमी सक्‍सेना नावाच्या एका महिलेने सिद्धार्थ गायब असल्याची माहिती आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन दिली. ती सिद्धार्थची जवळची मैत्रिण असल्याचा दावा तिने केला. मात्र, त्यानंतर सोमीने ही पोस्ट डिलीट केली. 

सिद्धार्थने कॉमेडी सर्कस, छोटे मिया बडे मिया, लाफ्टर के फटके आणि कॉमेडी सर्कस के अजूबे यांसारख्या कॉमेडी शो मध्ये काम केले होते.  
 

Read More