Marathi News> मनोरंजन
Advertisement

म्हणून २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनं मिलिंद सोमणला सोडलं

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होता. 

म्हणून २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनं मिलिंद सोमणला सोडलं

मुंबई : मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होता. पण आता मिलिंद आणि अंकिताचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या येत आहेत. २७ वर्षांच्या अंकितासोबत अफेअर असल्यामुळे ५२ वर्षांच्या मिलिंद सोमणला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल करण्यात आलं होतं. हे दोघं लवकरच लग्न करतील, असंही बोललं जात होतं. पण मीडिया रिपोर्ट्स नुसार आता हे दोघं लग्न करणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

लग्नाला अंकिताचा नकार

मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार अंकिता सध्या लग्न करु इच्छित नाही पण मिलिंदला मात्र लग्न करायचं होतं. या कारणामुळे दोघांमध्ये ब्रेक अप झाला आहे. तर दुसरीकडे अंकिताला लॉटरी लागल्यामुळे तिनं मिलिंदला सोडल्याच्याही चर्चा आहेत. अंकिता फोनवर ऑनलाईन कसीनो खेळायची. यामध्ये अंकिता ८ लाख ७३ हजार रुपये जिंकली आणि आता अंकिताला मिलिंदची गरज नसल्याचा दावाही केला जात आहे. याआधी अंकिता फ्लाईट अटेंडंट होती. तिला २६ हजार रुपये पगार होता.

मी वयानं अजून लहान आहे. माझ्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी पटापट घडत आहेत. मला स्वातंत्र्य हवं आहे. जिंकलेल्या पैशांनी मला कुटुंबाला मदत करायची आहे. एवढ्या लवकर मला लग्न करायचं नाही. मिलिंद आणि माझ्या मित्रांना हे समजेल, असं अंकिता एका मुलाखतीमध्ये म्हणाली आहे. रिपोर्टनुसार अंकिता आणि मिलिंद २१ एप्रिलला लग्न करणार होते. हे दोघं दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 

 

Read More