Marathi News> मनोरंजन
Advertisement

Milind Soman आणि Ankita Konwar यांचं चुंबन! Video पोस्ट करत सोमणनं सांगितलं, "यापेक्षा चांगलं..."

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर मनोरंजन विश्वातील लक्षवेधी जोडपं आहे. सोशल मीडियावर जोडपं कायम चर्चेत असतं. 

 Milind Soman आणि Ankita Konwar यांचं चुंबन! Video पोस्ट करत सोमणनं सांगितलं,

Milind Soman And Ankita Konwar Hot Kiss: मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर मनोरंजन विश्वातील लक्षवेधी जोडपं आहे. सोशल मीडियावर जोडपं कायम चर्चेत असतं. आतापर्यंत या जोडप्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एक किसिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सध्या मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार लडाखमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. या सुट्ट्यांमधील धमाल मस्तींचा व्हिडीओ आणि फोटो दोघंही सोशल मीडियावर शेअर करत आहेत. पण या दोघांच्या किसिंगच्या व्हिडीओने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओमध्ये मिलिंद सोमण अंकिताजवळ जातो आणि किस करतो. त्यानंतर अंकिता मिलिंदला गुदगुल्या करते तेव्हा मिलिंद तिच्या नाकावर किस करतो. 

मिलिंद सोमणने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला असून लिहिलं आहे की, "निळंभोर आकाश, सर्वात स्वादिष्ट कलिंगड आणि लडाखमधील सर्वात गोड चुंबन, यापेक्षा चांगलं काय असू शकते?", अशी पोस्ट करत  #life #love #happiness असे हॅशटॅग टाकले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एप्रिल 2018 मध्ये मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर लग्नबंधनात अडकले आहेत. आपल्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीशी लग्न केल्याने मिलिंद सोमण चर्चेत होता. 

Read More