Marathi News> मनोरंजन
Advertisement

माझ्या नवऱ्याची बायको : सासूने गुरूनाथला केलेली मदत राधिकाला कळेल का?

माझ्या नवऱ्याची बायको : सासूने गुरूनाथला केलेली मदत राधिकाला कळेल का?

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची सुरुवात गुरूच्या घरापासून झाली. कुरिअर बॉयच्या वेशात गुरु आपल्या आईकडून पैसे घ्यायला येतो. आईकडून पैसे घेऊन निघणार एवढ्यात राधिका दारावर येऊन वेळ वाजवते आणि सरीता व गुरुची तारंबळ उडते. दरम्यान गुरु आतल्या खोलीत लपून बसतो व संधी साधून तेथून गुपचूप पळ काढतो. काही वेळाने राधिका सौमित्रला फोन करून कोर्टात घडलेली सर्व हकीकत सांगून टाकते. दुसरीकडे महाजनी काका नाना नानींच्या घरी जाऊन चर्चा करत असतात.

एवढ्यात तिथे कुरिअर वाला येतो. त्यावरून महाजनीय काका म्हणतात दुपारी मी वेगळाच कुरिअर वाला पहिला व त्यात मला गुरु असल्याचा भास झाला.दरम्यान सरीतासाठी आणलेली साडी राधिका सरीताला देते परंतु ती ना स्विकारता राधिकाशी रागानेच बोलते. रात्री गुरु शनायाकडे आल्यावर आईने पैसे दिल्याचे शनायाला सांगतो आणि आई आपल्या बाजूने आहे असे सांगतो. दुसऱ्या दिवशी राधिका घरातील कामे आवरून ऑफिसला जायला निघत असते, दरम्यान सरीताला चहा द्यायला जाते. सरीताला चहा देताना राधिकाची नजर सरीताच्या हातांकडे जाते आणि राधिका तिला बांगड्या आणि गळ्यातील माळ कुठे गेली असा सवाल करते.

परंतु सरीता राधिकाला काहीच न सांगता नकोत उत्तर देते. सरीता राधिकापासून काहीतरी लपवते आहे हे राधिकाच्या लक्षात येते. राधिकाने गुरुसाठी आपल्या बांगड्या आणि माळ विकले हे गुपित राधिकाला कळेल का? हे बघण्यासाठी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा उद्याचा एपिसोड आवर्जून बघा, अगदी न चुकता. 

Read More