Marathi News> मनोरंजन
Advertisement

'गुरू' अपघातातून थोडक्यात बचावला

कुठे आणि कसा झाला अपघात 

'गुरू' अपघातातून थोडक्यात बचावला

मुंबई : 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील गुरूनाथ म्हणजे अभिजीत खांडकेकर आणि राधिका म्हणजे अनिता दाते ही लोकप्रिय पात्र आहेत. या पात्रांशी प्रत्येक प्रेक्षक आज जोडला गेला आहे. गुरू आणि राधिकाच्या सुखदुःखात प्रेक्षक आपलं सुखदुःख समजत असतो. अशातच गुरूनाथच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक बातमी. 

अभिनेता अभिजीत खांडकेकर एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे. रविवारी 25 नोव्हेंबर रोजी शूटिंगला जाताना अभिजीतचा हा अपघात झाल. शुटिंगला जात असताना समोरील ट्रकमधून धातूचा पाईप अभिजीतच्या कारच्या दिशेने घरंगळत आला. पण सुदैवाने अभिजीतला कोणतीही दुखापत झाली नाही. 

fallbacks

या अपघातात अभिजीतच्या कारची समोरील काच पूर्णपणे तुटली आणि तो पाईप पुलाखाली पडला. सुदैवाने या अपघातात कुणीच जखमी झालेलं नाही. फक्त अभिजीतच्या कारचं नुकसान झाल्याचं त्याने सांगितलं. हा फोटो अभिजीतने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता. आणि आपण सुखरूप असल्याचं सांगितलं. 

अभिनेता अभिजीत खांडकेकर साकारत असलेला 'गुरू' हा अतिशय लोकप्रिय आहे. दोन बायका आणि फजिती ऐका अशी गत अनेकदा मालिकेत गुरूची झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. 

Read More