Marathi News> मनोरंजन
Advertisement

'जर तुमची वृत्ती...', मराठमोळी गायिका आर्या आंबेकरची 'ती' पोस्ट चर्चेत

आर्या आंबेकरचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. आता तिची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. 

'जर तुमची वृत्ती...', मराठमोळी गायिका आर्या आंबेकरची 'ती' पोस्ट चर्चेत

Aarya Ambekar People Approach Instagram Post : आपल्या गोड आवाजाने कानांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणून आर्या आंबेकरला ओळखले जाते. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली. गायन क्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनय क्षेत्रातदेखील तिचं नशीब आजमावलं आहे. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनयात पदार्पण केले. आर्या आंबेकरचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. आता तिची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. 

आर्या आंबेकर ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता आर्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने प्रत्येकाला शिकण्याचा सल्ला दिला आहे. 

हेही वाचा :  कोणी ग्रॅज्युएट तर कोणी मास्टर्स, जाणून घ्या मुकेश अंबानींसह त्यांच्या कुटुंबियांचं शिक्षण?

आर्या आंबेकर काय म्हणाली?

"प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याची जर तुमची वृत्ती असेल, तर लोकांनी तुमचा फायदा जरी घेतला, तरी तुमचाही प्रत्येकाकडून फायदाच होणार आहे.!" असे आर्या आंबेकर म्हणाली. तिच्या या पोस्टवर असंख्य चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा : 'केलेली मदत सांगायची नसते...', चाहत्याची 'ती' कमेंट पाहून विशाखा सुभेदारचे सडेतोड उत्तर, म्हणाली 'माझ्या...'

यात एकाने "तुझ्या सुंदरतेपुढे आणि आवाजापुढे मराठी नायिका पाणी कम चाय आहेत", अशी कमेंट केली आहे. तर एकाने "किती गोड हास्य आणि सुंदर देखणे ते रूप" असे म्हटले आहे. तसेच एकाने "नात्याला नवं नाव हवे", अशी कमेंट केली आहे. 

‘ती सध्या काय करते’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण

दरम्यान आर्या आंबेकर ही आज अनेकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्समध्ये गाणी गायली आहेत. त्याबरोबर तिने काही मराठी चित्रपटांसाठी आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गोड गळ्यासोबत आर्याच्या सौंदर्याने देखील अनेकांना भुरळ घातली आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.

Read More