Marathi News> मनोरंजन
Advertisement

'हा' अभिनेता लवकरच होणार बाबा

सॉरी हे कुणाचं नाव असू शकतं का? असा प्रश्न 'दुनियादारी'ने उपस्थित केला. 

'हा' अभिनेता लवकरच होणार बाबा

मुंबई : सॉरी हे कुणाचं नाव असू शकतं का? असा प्रश्न 'दुनियादारी'ने उपस्थित केला. मराठीतील गाजलेला सिनेमा 'दुनियादारी' या सिनेमांत 'सॉरी' ची भूमिका कारणारा अभिनेता प्रणव रावराणे लवकरच बाबा होणार आहे. प्रणव या सॉरी या भूमिकेबरोबरच ‘आपण यांना पाहिलंत का? ‘हे  नाटकही चांगलेच चर्चेत राहिले. ''लगे रहो राजाभाई'',''तीन जीव सदाशिव'',''एक साथ नमस्ते'' या नाटकातही त्याला दमदार भूमिका मिळाली. प्रणव रावराणे याची मराठी जगतात उत्तम कॉमेडी कलाकार म्हणून ख्याती आहे. त्याने अनेक स्टेज शो हि केलेत.

fallbacks

प्रसिद्ध नाटक ‘वासूची सासू’ या आधी दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलं. त्यात थोडाफार बदल करून हीच भूमिका प्राणवणे सादर केली प्रेक्षकांनीही या नाटकाचे स्वागतच केले. नाटकासोबतच अनेक मराठी चित्रपटात त्याने काम केले आहे. भागमभाग, आबांनी उडवला बार, हिप हिप हुर्रे, धाव मन्या धाव यातील भूमिका त्याने उत्कृष्टरित्या साकारल्या. नुकतेच त्याने ‘आटपाडी नाईट्स’ चित्रपटात काम केले आहे. अशा या हास्याचा झरा असलेल्या प्रणवकडे बाळाचं आगमन होणार आहे. 

fallbacks

प्रणवचे डिसेंबर २०१७ मध्ये अमृता सकपाळसोबत लग्न झाले होते. अमृता ही देखील एक अभिनेत्री असून तिने ''माझे मन तुझे झाले'' या मालिकेत काम केले होते. तसेच ''ऑल द बेस्ट'' नाटकात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आता प्रणव आणि अमृता यांच्या घरात एका चिमुकल्या बाळाचे आगमन होणार आहे.

fallbacks

प्रणवने फेसबुक या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सगळ्यांना ही बातमी सांगितली आहे. अमृताने नुकतेच मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. प्रणवने फोटोशूटमधील काही निवडक फोटोज आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. या फोटोंसोबत प्रणवने खूप छानशी कॅप्शन देखील लिहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, सांगण्यास आनंद होत आहे की... लवकर आमच्याकडे बाल कलाकार येणार आहे... प्रणवने शेअर केलेल्या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी खूप सारे लाइक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर पसंतीला पडत आहेत. 

Read More