Marathi News> मनोरंजन
Advertisement

सई- ललितची 'कलरफूल' केमिस्ट्री वेधतेय सर्वांचं लक्ष

कायमच प्रयोगशील भूमिकां निवडत त्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा अभिनेता ललिक प्रभाकर आता एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. 

सई- ललितची 'कलरफूल' केमिस्ट्री वेधतेय सर्वांचं लक्ष

मुंबई : कायमच प्रयोगशील भूमिकां निवडत त्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा अभिनेता ललिक प्रभाकर आता एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. 

ललितचा हा प्रवास विविध रंगांनी बहरलेला असणार आहे. कारण त्याला यात एक खास जोडीदारही मिळालेली आहे. ही जोडीदार आहे अभिनेत्री सई ताम्हणकर. 

ललितच्या नव्या प्रवासाबाबत तुम्ही कोणते तर्क लावण्यापूर्वी ही पोस्ट पाहाच. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ललित प्रभाकर यानं एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एका बागेतील बाकावर तो आणि सई ताम्हणकर बसलेले दिसत आहे. दोघांची एकमेकांवर रोखलेली नजर आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहताना या जोडीच्या केमिस्ट्रीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. हा फोटो आहे या दोघांच्या आगामी चित्रपटाचा. 'कलरफूल' असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे.

यंत्र पिक्चर्सची यांच्या वतीनं सादर करण्यात येणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी घेतलं आहे. एका सुरेख जोडीची कहाणी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

Read More