Marathi News> मनोरंजन
Advertisement

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला रामराम करणार का? कुशल बद्रिके म्हणाला...

कुशलची हिंदी कार्यक्रमामध्ये वर्णी लागल्यानंतर तो ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला रामराम करणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण त्याने स्वत:च याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. 

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला रामराम करणार का? कुशल बद्रिके म्हणाला...

Kushal Badrike On Chala Hawa Yeu Dya : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला ओळखले जाते. झी मराठी वाहिनीवरील हा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा सूत्रधार डॉ. निलेश साबळेंने या शो ला रामराम केला. त्यानंतर कुशल बद्रिकेने देखील 'झी मराठी'चे आभार मानणारे पत्र पोस्ट केले. यानंतर आता कुशलने तो या कार्यक्रमातून एक्झिट घेणार की नाही याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. 

कुशल बद्रिकेच्या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो समोर

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे कुशल बद्रिके हा घराघरात पोहोचला. त्याला विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून ओळखले जाते. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवल्यानंतर आता कुशल बद्रिके हा एका हिंदी विनोदी कार्यक्रमात झळकत आहे. सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या विनोदी कार्यक्रमामध्ये कुशल झळकणार आहे. येत्या 9 मार्चपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. त्यापूर्वी या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत तो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

'चला हवा येऊ द्या'मध्ये झळकण्याबद्दल दिले स्पष्टीकरण

कुशलच्या या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यावर एकाने “पण, हवा येऊ द्याचं काय होईल? तुम्ही असणार की नाही?” असा प्रश्न कुशल बद्रिकेला विचारला आहे. त्यावर कुशलने असणार असे उत्तर दिले आहे. तर एकाने फक्त कुशलसाठी हा कार्यक्रम पाहावा लागेल, अशी कमेंट केली आहे. तर काहींनी अभिनंदन, आम्हाला तुझा अभिमान वाटतो, अशा कमेंट केल्या आहेत. 

fallbacks

कुशलची हिंदी कार्यक्रमामध्ये वर्णी लागल्यानंतर तो ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला रामराम करणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण त्याने स्वत:च याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. कुशलने अनेक सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे. ‘पांडू हवालदार’, ‘बाप माणूस’, ‘स्लॅम बूक’, ‘रावरंभा या चित्रपटात तो झळकला. आता लवकरच तो सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या नव्या हिंदी विनोदी कार्यक्रमात झळकणार आहे.

Read More