Marathi News> मनोरंजन
Advertisement

'पैशांपेक्षा आदर...', गौरव मोरेने सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचे कारण

आता गौरव मोरेने हा कार्यक्रम का सोडला, यामागचे कारण सांगितले आहे. 

'पैशांपेक्षा आदर...',  गौरव मोरेने सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचे कारण
Updated: May 09, 2024, 07:48 PM IST

Gaurav More Why Left From Maharashtrachi Hasyajatra : 'फिल्टरपाड्याचा बच्चन' अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखले जाते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. सध्या गौरव हा मॅडनेस मचाऐंगे या कार्यक्रमात झळकत आहे. या कार्यक्रमामुळे गौरव मोरने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला कायमच रामराम केला आहे. आता गौरव मोरेने हा कार्यक्रम का सोडला, यामागचे कारण सांगितले आहे. 

गौरव मोरेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर कॅप्शन देताना त्याने हास्यजत्रेतून एक्झिट घेत असल्याचे सांगितले होते. "Hello everyone i am a gaurav more from powai filter pada.... Ta na na na na naaaaaa....आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची…… रसिक प्रेक्षक आपण हया साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधुन आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो, असे गौरव मोरेने म्हटले होते. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील ! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे, असे  गौरव मोरे म्हणाला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

आता गौरव मोरेच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांच्या कमेंट पाहायला मिळत होत्या. यावर अनेकांनी त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडण्यामागचे कारण विचारले होते. यावर एकाने "ओमकार भोजने सारखा चुकीच्या शो मध्ये जाऊन इमेज खराब नका करून घेऊ भाऊ..तुम्ही हास्य जत्रे मध्येच शोभता.. तरी हा आपला वैयक्तिक निर्णय शुभेछा", अशी कमेंट केली आहे. त्यावर गौरवने थोडक्यात उत्तर दिले आहे. "प्रत्येक गोष्टीला कारण असतात दादा", असे म्हणत गौरव मोरेने त्या चाहत्याला उत्तर दिले आहे.

fallbacks

तर एकाने नेटकऱ्याने “पैसा बहुत कमिनी चीज होती है” अशी कमेंट केली होती. त्यावर “Respect बडी चीज है भाई” असे गौरवने म्हटले आहे. तर एकाने "गौरव सर मला वाटत आहे, तुम्ही प्रँक करत आहात. नवीन प्रोजेक्ट मिळाला असेल तर ऑल द बेस्ट. मला तर हा प्रँक वाटत आहे", अशी कमेंट केली आहे. त्यावर गौरवने मुद्दा नवीन प्रोजेक्टचा नाही, असतात काही गोष्टी, अशी कमेंट केली आहे.