Marathi News> मनोरंजन
Advertisement

मिस वर्ल्डचा लूक पाहून चाहते चिंतेत; 'या' गोष्टीमुळे अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

 बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या माजी मिस वर्ल्ड विजेत्या मानुषी छिल्लरचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. 

मिस वर्ल्डचा लूक पाहून चाहते चिंतेत; 'या' गोष्टीमुळे अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

मुंबई : बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या माजी मिस वर्ल्ड विजेत्या मानुषी छिल्लरचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. मानुषी एअरपोर्टवर स्पॉट झाली. विश्व सुंदरी जरी खूपच ग्लॅमरस दिसत असली तरी कॅमेऱ्यासमोर पोज देण्यासाठी उभी राहताच ती ट्रोलिंगची शिकार झाली. 

मानुषी छिल्लरचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर येताच व्हायरल होऊ लागला आणि लोकांनी तिला विविध प्रकारचे टोमणे मारण्यास सुरुवात केली. काही लोकांनी तिच्या बॉडी टाईपवरही प्रश्न उपस्थित केले.

मानुषी छिल्लरचा व्हिडिओ  
नुकताच मानुषी छिल्लरचा एअरपोर्टवर स्पॉट झालेला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. लूकबद्दल सांगायचं झालं तर, तिने काळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातला आहे याचबरोबर तिने काळ्या रंगाचे  टाइट्स  घातले होते. तिचे हे काळे  टाइट्सही हलक्या पारदर्शक होत्या. अभिनेत्रीने काळ्या रंगाचे बुट परिधान करुन तिचा लूक पूर्ण केला आहे. 

कारमधून उतरल्यानंतर जेव्हा मानुषी छिल्लर कॅमेऱ्यासमोर पोज देण्यासाठी पुढे आली तेव्हा तिच्या स्कीनीमुळे लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पहला सिनेमा झाला फ्लॉप
मानुषी छिल्लरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं नाव 'सम्राट पृथ्वीराज' असं आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. गेल्या महिन्यात ३ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये विशेष काही यश मिळवलं नाही. सुरुवातीला हा चित्रपट चांगला चालला. पण नंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळाला नाही. मात्र, मानुषीचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला असूनही तिच्या हातात अजून एक मोठा प्रोजेक्ट आला आहे.

Read More