Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मंटो'चा टीझर रिलीज, आज कान फेस्टिवलमध्ये झळकणार

या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

'मंटो'चा टीझर रिलीज, आज कान फेस्टिवलमध्ये झळकणार

मुंबई : उर्दूतील कथालेखक सआदत हसन मंटो यांच्यावरील चरित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण जरी पूर्ण झाले असले तरी  मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी काही काळ वाट पाहावी लागत आहे. दरम्यान या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझर पाहता हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 'मंटो' चा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. १ मिनिट २७ सेकंदाच्या या टीझरमधूनच तुम्ही सिनेमाच्या भव्यतेचा अंदाज बांधू शकता. या सिनेमात  नवाजुद्दिन सिद्दिकी या चरित्रपटात सआदत हसन मंटोच्या  तर अभिनेत्री रसिका दुग्गल मंटोच्या पत्नीची भूमिकेत आहे. याव्यतिरिक्त परेश रावल, ऋषि कपुर आणि ताहिर राज भसीनदेखील आहेत.

आज कान फेस्टिव्हलमध्ये 

७० व्या 'कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या बहुचर्चित चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. आज १३ मेला हा सिनेमा कान फिल्म फेस्टिवलमध्ये दाखविण्यात येणार आहे. 'अन सर्टन रिगार्ड' या सेक्शनमध्ये फेस्टिवलला हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.
Read More