Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलिष्काचं मुंबईवरील हे नवं गाणं व्हायरल

आरजे मलिष्काचं मुंबईवर एक नवं गाणं व्हायरल होतं आहे. मलिष्काच्या या गाण्याचं संगीत सैराट सिनेमाच्या झिंगाट गाण्याचं आहे. 

मलिष्काचं मुंबईवरील हे नवं गाणं व्हायरल

मुंबई : आरजे मलिष्काचं मुंबईवर एक नवं गाणं व्हायरल होतं आहे. मलिष्काच्या या गाण्याचं संगीत सैराट सिनेमाच्या झिंगाट गाण्याचं आहे. मुंबई गेली खड्ड्यात, गेली खड्ड्यात, गेली खड्ड्य़ात रे असे या गाण्याचे बोल आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी पूरस्थिती निर्माण झाली होती, मुंबईत मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं.

मुंबईत साचलेल्या या पाण्यामुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा ठप्प झाली होती, अनेक घरात पाणी साचलं होतं, रस्त्यावरही लोकांना वाट काढणे कठीण जात होतं. 

यापूर्वी मलिष्काने मुंबईवर सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का हे गाणं तयार केलं होतं. आता झिंगाटची थिम वापरून मुंबई गेली खड्ड्यात हे गाणं तयार केलं आहे, हे गाणं व्हायरल होतं आहे.

Read More