Marathi News> मनोरंजन
Advertisement

एअरपोर्टवर मलायकाने असं काय केलं... लोक म्हणाले,'अर्जुनला शोधत आहेस का?'

मलायकाला सर्वत्र येते अर्जुनची आठवण....   

एअरपोर्टवर मलायकाने असं काय केलं... लोक म्हणाले,'अर्जुनला शोधत आहेस का?'

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांचा घटस्फोट झाला आहे. पण दोघे आजही मुलासोबत खास क्षण व्यतित करतात. पुन्हा अजबाज आणि मलायका मुलगा अरहानसाठी एकत्र आले. अरहान परदेशात शिकत असून शुक्रवारी रात्री तो मुंबईतील त्याच्या घरी परतला. त्याला घेण्यासाठी अरबाज आणि मलायका एअरपोर्टवर पोहोचले. तेव्हा तिघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमुळे मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. व्हिडीओमध्ये मलायका आणि अरबाज मुलाला हग करताना दिसत आहेत. यादरम्यान मलायका आणि अरबाज एकमेकांकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की अरहान आणि अरबाज पुढे चालायला लागतात. त्याचवेळी मलायका अरोरा त्यांच्या मागे येते आणि इकडे तिकडे पाहू लागते. आता मलायका अरोराला यासाठी ट्रोल केले जात आहे. 'मलायका तू अर्जुनला शोधत आहेस का?' असा प्रश्न विचारत मलायकाला ट्रोल केलं जात आहे. 

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर हे दोघे क्वचितच एकत्र दिसले आहेत. मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. 

 

 

Read More