Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री मलायका अरोराला गंभीर दुखापत; समोर आला व्हिडीओ

अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसंच, अभिनेत्री अनेकदा अनेक ठिकाणी स्पॉट होते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत असतात.

अभिनेत्री मलायका अरोराला गंभीर दुखापत; समोर आला व्हिडीओ

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसंच, अभिनेत्री अनेकदा अनेक ठिकाणी स्पॉट होते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत असतात, कधी अभिनेत्री जिमला जाताना स्पॉट होते तर कधी ती रेस्टारंटमध्ये जाताना दिसते. नुकतीच मलायका पुन्हा एकदा स्पॉट झाली आहे, मात्र यावेळी अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे मात्र तिला असं पाहिल्यानंतर तिचे चाहते मात्र भलत्याच चिंतेत पडलेले दिसत आहेत.   

कोणती खूण आहे मलायकाच्या पायावर?
खरंतर, मलायकाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये  अभिनेत्रीच्या पायावर एक खूप मोठी काळी खूण दिसत आहे, जे पाहून चाहते अंदाज लावत आहेत की अभिनेत्रीला दुखापत झाली आहे.  याचबरोबर मलायकादेखील तिच्या पायावरची ही खूण लपवताना दिसली. यावेळी मलायकाने ग्रे कलरचा टी-शर्ट आणि ब्लॅक शॉर्ट्स परिधान केली होती. त्याचबरोबर, आता यूजर्स अभिनेत्रीच्या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

यूजर्स देत आहेत रिएक्शन
अभिनेत्रीच्या व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहलं आहे की, हा अर्जुनचा लॅब बाईट आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं आहे की, मलायकाला, काय झालं आहे? त्याचबरोबर अजून एकाने लिहीलंय की, तुला नक्की काय झालं आहे. तर अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर अनेकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. मलायका अनेकदा जिममध्ये जाताना दिसते. यावेळीही अभिनेत्री जिममध्ये जाताना स्पॉट झाली होती, मात्र तिच्या पायावर असलेल्या या मोठ्या काळ्या खुणेने यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकताच साजरा केला वाढदिवस
नुकताच अभिनेत्रीने तिचा वाढदिवसही साजरा केला आहे. चाहत्यांनीही अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी, अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आणि स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावरही व्हायरलही झाली आणि चाहत्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या.

Read More