Marathi News> मनोरंजन
Advertisement

PHOTO : बिकिनीतील फोटोने मलाइका ट्रोल

मलाइकाने इंन्स्टाग्रामवर रेड बिकिनीतला फोटो शेअर केला आहे.

PHOTO : बिकिनीतील फोटोने मलाइका ट्रोल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा सतत काही ना काही कारणाने लाइमलाइटमध्ये असते. सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या तिच्या नात्याच्या चर्चेमुळे सोशल मीडियावर मलाइका चर्चेचा विषय आहे. नुकताच मलाइकाने सोशल मीडिया इंन्स्टाग्रामवर तिचा रेड बिकिनीतला फोटो शेअर केला आहे. मलाइकाने हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मलाइकासोबत लग्नकरण्याबाबत अर्जुन कपूरला प्रश्न विचारण्यात आला. 'डीएनए'शी बोलताना या प्रश्नावर उत्तर देताना अर्जुन कपूरने मी आता ३३ वर्षांचा आहे आणि लग्नाकरण्यासाठी कोणतीही घाई नसल्याचं त्यानं म्हटलंय.

मलाइका सोशल मीडियावर सतत अॅटिव्ह असते. अनेक फोटोज ती शेअर करत असते. मलाइकाने तिचे पाण्याखालील रेड बिकिनीतील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला तिने 'शांती, स्थिरता कोणत्याही मेडिटेशनशिवाय कमी नाही' असं कॅप्शन दिलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलाइकाने शेअर केलेल्या या पोस्टवर दिग्दर्शिक फराह खाननेही मजेशीर कमेंट केली आहे. फराहने तिच्या फोटोवर 'हे सगळं ठीक आहे पण, अंडरवॉटर तुझे फोटो कोण काढतंय?' असा सवाल केला आहे. यूजर्सनी अर्जुनशिवाय दुसरं कोण फोटो काढणार? अशी कमेंट केली आहे. फराहच्या या प्रश्नावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

अर्जुन कपूरने 'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत, मी सध्या लग्न करणार नाही. मी ३३ वर्षांचा आहे आणि मला लग्नासाठी कोणतीच घाई नाही, तसा काही विचार नाही' असं तो म्हणाला. मलाइका आणि अर्जुन गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर तुमच्या दोघांच्या लग्नाबाबत असणाऱ्या अफवांवर तुझं काय म्हणण आहे? असा प्रश्न विचारल्यावर अर्जुनने 'अशा अफवा कोणतंही नुकसान करत नाही. मला असं वाटतं की, लोकांना सतत याबाबत प्रतिक्रिया देणं अतिशय थकवणारं काम आहे. प्रत्येकवेळी या सगळ्यांना उत्तरं देणं मला गरजेचं वाटत नाही.' असं त्याने म्हटलंय. 

Read More