Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायकाने दिली तिच्या आणि अर्जुनच्या नात्याची कबुली

एका कार्यक्रमात बोलत असताना मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या नात्याला कबुली दिली.

मलायकाने दिली तिच्या आणि अर्जुनच्या नात्याची कबुली


मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे नाते जुळेल आणि कधी कोणाचे प्रेम भंग होईल हे काही सांगता येत नाही. सध्या आभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्यातील नाते बहरताना दिसत आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शो मध्ये बॉलिवूड मंडळींच्या नात्यांबद्दल अनेक उलगडे होत असतात. नुकताच अभिनेत्री प्रियंका चोप्राने एक खुलासा केला आहे. अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत असल्याचे तिने सांगितले. एका कार्यक्रमात बोलत असताना मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या नात्याला कबुली दिली.

 

या कार्यक्रमाचा छोटा भाग ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात किरण खैर, विर दास, मलायका अरोरा, आणि मलायका दुआ उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये मलायकाने एक वक्तव्य केले. ती म्हणाली, "मला अर्जुन आवडतो या मार्गाने किंवा त्या मार्गाने."

अर्जुन कपूर सध्या त्याच्या ‘संदीप और पिंकी फरार’,‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ आणि ‘पानीपत’ सिनेमांच्या शूटिंग मध्ये व्यग्र आहे. ‘पानीपत’ सिनेमामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा ६ डिसेंबर रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. तर दुसरी कडे मलायका तिच्या फॅशन शोमध्ये व्यग्र आहे. 

Read More