Marathi News> मनोरंजन
Advertisement

अर्जूनसोबत लग्न करण्याआधीच फॅमिली प्लनिंगची चर्चा; मलायकाचं मोठं वक्तव्य

मलायका आता तिचा एक नवीन शो घेऊन आली आहे, ज्याबद्दल ती चर्चेत आहे. विशेष म्हणजे मलायकाही या शोमध्ये ट्रोलला उत्तर देताना दिसणार आहे.

अर्जूनसोबत लग्न करण्याआधीच फॅमिली प्लनिंगची चर्चा; मलायकाचं मोठं वक्तव्य

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आधी अरबाज खानसबोत घेतलेल्या घटस्फोटोमुळे चर्चेत असणारी मलायका अरोरा आता अर्जून कपूरमुळे चर्चेत आली आहे. अनेकदा मलायका आपल्या आणि अरबाजच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसते. एकीकडे मलायका अर्जून कपूरला डेट करत आहे तर दुसरीकडे अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहेत. अनेकदा मलायका अर्जूनसोबत स्पॉट होते तर अरबाज जॉर्जियासोबत स्पॉट होतो. पण सध्या मलायकाने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे.

मलायका आता तिचा एक नवीन शो घेऊन आली आहे, ज्याबद्दल ती चर्चेत आहे. विशेष म्हणजे मलायकाही या शोमध्ये ट्रोलला (Troller) उत्तर देताना दिसणार आहे. मलायका तिच्याच चॅट शोमध्ये (Chat show) पहिल्यांदाच दिसणार आहे. ज्याचं नाव आहे 'मूव्हिंग इन विथ मलायका'  नुकताच तिचा हा शो डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये नृत्य दिग्दर्शक फराह खान सहभागी झाली होती. यावेळी बोलताना फराहने मलायकाला तिच्या माजी पती अरबाजच्या नात्याविषयी विचारलं यानंतर मलायकादेखील खुलेपणानं बोलली.

मलायकाला फराह खानने अर्जून बरोबर लग्न आणि मुलांच प्लानिंग कधी करणार असा प्रश्न विचारला यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली की, बघा या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत.  अर्थातच आम्ही दोघं याबद्दल बोललो आहोत. साहजिकच जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता किंवा तुमच्या जोडीदारासोबत असता, तेव्हा तुम्ही अनेकदा या गोष्टींबद्दल बोलत असता, पण मला असं वाटतं की, मी रिलेशनशिपमध्ये एक चांगली व्यक्ती आहे. आतापर्यंत मी जे काही निर्णय घेतले आहेत ते मी घेतले आहेत कारण मला आनंदी रहायचं आहे. आणि आज माझ्या आयुष्यात जी व्यक्ती आहे, ती मला आनंदी ठेवते, हेच खूप महत्त्वाचं आहे. बाकी जग काय म्हणतं ह्याची मला अजिबात पर्वा नाही.'' 

अरबाजने 1998 मध्ये मलायका अरोरासोबत लव्ह मॅरेज केलं होतं. दोघांना 20 वर्षांचा मुलगाही आहे. त्यांच्या मुलाचे नाव अरहान खान आहे. 19 वर्षे लग्नबंधनात राहिल्यानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2016 मध्ये त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली आणि 2017 मध्ये त्यांच्या घटस्फोटाला अधिकृत मान्यता मिळाली. मलायकापासून घटस्फोट घेतल्यानंतर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे आणि ते गेल्या 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दुसरीकडे मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

Read More