Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायका अरोरा गाडीत बसताना Oops Moments ची शिकार

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते. 

मलायका अरोरा  गाडीत बसताना  Oops Moments ची  शिकार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या बोल्ड लूकमुळे आणि अभिनेता अर्जुनसोबतच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असते. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर 48 वर्षीय मलायका अरोरा तिच्या वयापेक्षा 11 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. यामुळे दोघांनाही अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे.

मलायकाने पुन्हा एकदा तिच्या आउटफिटने धुमाकूळ घातला आहे. मात्र, यादरम्यान ती  Oops Moments ची  शिकार झाली. मलायका अरोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून लोकं तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत तिला ट्रोल करत आहेत.

एका यूजरने कमेंट करत लिहीलयं की, म्हातारी. अशाच अनेक कमेंट मलायकाच्या या व्हिडिओवर येत आहेत. मलायका तिची बहीण अमृता अरोरा आणि कॉमन फ्रेंड अभिनेत्री करीना कपूरसोबत एका रेस्टॉरंटमधून डिनरसाठी निघाली असताना कॅमेऱ्यात कैद झाली. मलायका अरोराच्या परिधान केलेल्या ड्रेसने संपूर्ण लक्ष वेधून घेतलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिने अतिशय बोल्ड ड्रेस परिधान केला होता. खरंतर मलायकाने ब्राशिवाय स्किन टाईट क्रॉप टॉप घातला होता. यामुळे ती गाडीत बसली असतानाच Oops Moments ची शिकार झाली. मात्र, मलायकाला जेव्हा विचित्र वाटलं तेव्हा ती तिचा ड्रेस हाताने एडजस्ट करताना दिसली.

Read More