Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीने शेअर केले वर्कआऊट व्हिडिओज

मैंने प्यार किया' या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आता ४९ वर्षांची झाली आहे. 

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीने शेअर केले वर्कआऊट व्हिडिओज

मुंबई : 'मैंने प्यार किया' या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आता ४९ वर्षांची झाली आहे. मात्र, ती अजूनही तितकीच ग्लॅमरस दिसते. या वयातही तिचा फिटनेस वाखाण्यासारखा आहे. वयाचा परिणाम तिच्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही. तिच्या या फिटनेसचे रहस्य उलघडले आहे ते तिच्या या वर्कआऊट व्हिडिओमधून.

भाग्यश्री सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून तिने तिचे बरेच वर्कआऊट व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पाहुयात...

 

भाग्यश्रीबद्दल काही खास गोष्टी

# महाराष्ट्राच्या शाही पटवर्धन घराण्यात श्रीमंत घराण्यात भाग्यश्रीचा जन्म झाला. 

# खूप लोकांना हे ठाऊक आहे की, तिने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. १९८७ मध्ये अमोल पालेकरच्या कच्ची धूप या टीव्ही शो मध्ये तिने काम केले होते.

# त्यानंतर १९८९ मध्ये आलेल्या मैंने प्यार किया या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. या सिनेमात ती सलमान खानची हिट हिरोईन झाली. यासाठी तिला फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्टरेस डेब्यूचा पुरस्कारही मिळाला. 

# या सिनेमानंतर तिचे करिअर उत्तम होईल असे वाटत असतानाच तिने बालपणीचा मित्र आणि बिझनेसमन हिमालय दासानीसोबत १९९० मध्ये लग्न केले आणि लग्नानंतर तिने अभिनयाला रामराम ठोकला.

# या दोघांना अवंतिका आणि अभिमन्यू ही दोन मुले आहेत. अभिमन्यू लवकरच सिनेसृष्टीत पर्दापण करण्याच्या तयारीत आहे.

 

Read More