मुंबई : साऊथचा सुपरस्टार महेश बाबू याची मुलगी सितारा हिने कलावती ( Kalaavathi Song) या गाण्यावर डान्स केला आहे जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महेश बाबू हा टॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय असतो. त्याच्या सोशल अकाऊंटवर तो नेहमी त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. (Mahesh Babu reaction on Daughter sitara's dance video)
महेश बाबू याने रविवारी मुलगी सिताराच्या डान्स व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये त्याची मुलगी सितारा कलावती चित्रपटातील एका गाण्यावर नाचत आहे. हे गाणे महेश बाबूच्या आगामी 'सरकारू वारी पाता' या चित्रपटातील आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, 'माझ्या तारा, तू मला यात पराभूत केलेस.' व्हिडिओमध्ये सितारा वडिलांच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिने छान डान्स केला आहे. तिचा डान्स पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल.
This is Best Reel So far #Sitara papa dancing for #Kalaavathi
— Pathan usif (@PUsif4141) February 20, 2022
Father & Daughter Duo #SarkaruVaariPataa @MusicThaman pic.twitter.com/70zr3AKFbB
हे गाणे गायक सिड श्रीराम यांनी गायले आहे. गाण्याचे बोल आहेत कलावती. हे गाणे १३ फेब्रुवारीला रिलीज झाले आहे. कलावती हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. या गाण्यात महेश बाबू आणि कीर्ती सुरेश दिसत आहेत. या गाण्याला ३५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत आणि ते YouTube वर पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
सरकारू वारी पाता हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. महेश बाबू याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या चित्रपटांना चांगलीच पसंती मिळाली आहे. रोमँटिक हिरो म्हणून तो लोकप्रिय आहेच. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तो लवकरच अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.