Marathi News> मनोरंजन
Advertisement

Mahesh Babu नं खरेदी केली गोल्ड रेंज रोवर... कारची किंमत ऐकूण बसेल धक्का

Mahesh Babu New Car: महेश बाबूनं खरेदी केलेली ही गाडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही कार लिमिटेड एडिशनमधील असून भारतात असलेल्या सगळ्यात महागड्या गाड्यांपैकी एक आहे. 

Mahesh Babu नं खरेदी केली गोल्ड रेंज रोवर... कारची किंमत ऐकूण बसेल धक्का

Mahesh Babu New Car: दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू हा तेलगू चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबू एक आलीशान म्हणजेच लक्झरीयस लाइफस्टाईल जगतो. महेश बाबू त्याच्या या लॅव्हिश लाइफमुळे नेहमीच चर्चेत येतो. त्याच्या घराचे आणि गाड्यांच्या कलेकश्नचे लाखो चाहते आहेत. अशात आता महेश बाबूनं त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका नवीन कारचा समावेश केला आहे. महेश बाबूनं नुकतीच खरेदी केलेल्या कारची किंमत ऐकूण तुम्हालाही धक्का बसणार आहे. 

महेश बाबूनं नवीन रेंज रोवर एसवी विकत घेतली आहे. महेश बाबूनं खरेदी केलेल्या या रेंज रोव्हरची किंमत ही 5.4 कोटी रुपये आहे. रेंज रोवर ही गाडी सेलिब्रिटींमध्ये खूप जास्त लोकप्रिय आहे. मोहनलाल, ज्युनियर एनटीआर, चिरंजीवी आणि अशा अनेक दाक्षिणात्य कलाकारांकडे ही कार आहे. पण महेश बाबूची कार ही त्या सगळ्यांपेक्षा वेगळी असून खूप खास आहे. महेश बाबूनं घेतलेली ही कार हैद्राबादमध्ये असलेल्या या सगळ्या कारच्या तुलनेत वेगळी आहे. त्यामुळे त्या रंगाची ती एकमेव कार आहे. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या सगळ्या कारच्या तुलनेत ती वेगळी कार आहे. त्यासोबत ही लिमिटेड अडीशन असलेल्या गाड्यांपैकी एक आहे. या कारची संपूर्ण फिनिशिंग ही गोल्डची आहे. 

fallbacks

महेश बाबूच्या कार कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर त्यात Rolls-Royce Ghost, Range Rover Vogue, Audi A7, BMW 7 Series, Mercedes-Benz S-Class या सगळया कार आहेत. 

हेही वाचा : Shivali Parab करते कॉफी पार्टनरची प्रतिक्षा? त्या फोटोनं वेधलं लक्ष

दरम्यान, महेश बाबूच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सध्या 'गुंटूर करम' या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यासोबत काम  करत आहे.रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री पूजा हेगडे आणि श्री लीला या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर एस थमन चित्रपटाला संगीतबद्ध करणार आहे. दरम्यान, याविषयी अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. या चित्रपटात महेश बाबूनं श्री लीलाचे आणखी बरेच स्टंट बदल्याचे म्हटले आहे. कारण त्याला चित्रपटाचा स्क्रिन प्ले इतका आवडला नव्हता. तर चित्रपटाच्या स्क्रिन प्लेमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. हा चित्रपट पुढच्यावर्षी 13 जुन 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर एसएस राजामौली यांच्यासोबत देखील महेश बाबूचा एक आगामी चित्रपट आहे.

Read More