Marathi News> मनोरंजन
Advertisement

सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल अशी आहे अभिनेत्याची Love Story

'या' सुपरस्टारने वयाने 4 वर्ष मोठ्या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या संपूर्ण लव्ह स्टोरी

  सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल अशी आहे अभिनेत्याची Love Story

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांनी त्यांच्याहून वयाने मोठ्या अभिनेत्रींसोबत लग्न केलं आहे. हाच ट्रेंड इतर सिनेमा इंडस्ट्रीतही पाहायला मिळतोय. बॉलिवूड अभिनेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक अभिनेते आता वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रींसोबत लग्न करत आहेत. अशाच एका साऊथ सुपरस्टारने त्याच्याहून 4 वर्षाने मोठ्या अभिनेत्रीसोबत लग्न केलं आहे. या साऊथ सुपरस्टारची ही लव्हस्टोरी कशी आहे ती जाणून घेऊयात.  

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) याचा आज 9 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महेश बाबूचे जितके चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतात तितकेच त्याची लव्ह लाइफ देखील खूप हिट आहे. नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar)आणि महेश बाबू हे दाक्षिणात्य जोडपे आहेत. महेश बाबूच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल माहिती देणार आहोत. 

पहिल्याच नजरेत पडला प्रेमात 

महेश बाबूने (Mahesh Babu) बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर पुढे एकापेक्षा एक चांगले अभिनय करून तो आता एक सुपरस्टार बनलाय. तो जितका चांगला अभिनेता आहे तितकाच तो एक प्रेमळ जोडीदार देखील आहे. नम्रता शिरोडकरसोबतची (Namrata Shirodkar) त्याची लव्हस्टोरी खुपच रंजक आहे. नम्रताला पाहिल्या पाहिल्याच तिच्या प्रेमात तो पडला होता.  

चित्रपटा दरम्यान जूळलं प्रेम
अभिनेत्री नम्रता शिरोडकरचा (Namrata Shirodkar) पहिला तेलगू चित्रपट वापसी हा महेशा बाबूसोबत (Mahesh Babu)करारबद्ध झाला होता. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही एकमेकांना पसंत करू लागले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री झाली आणि चित्रपटाचे शूटिंग संपताच या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले होते. महेश बाबूने सर्वप्रथम आपल्या बहिणीला आपल्या आणि नम्रताच्या नात्याबद्दल सांगितले होते. 

वयात इतके अंतर
10 फेब्रुवारी 2005 रोजी महेश आणि नम्रता लग्नाच्या बेडीत अडकले होते. महेश बाबू याची पत्नी नम्रता त्याच्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. पण दोघांमधील वयाचे हे अंतर कधीच दिसून आले नाही. लग्नानंतर नम्रताने चित्रपटांपासून दूर आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले. सध्या महेश आणि नम्रता यांना गौतम आणि मुलगी सितारा अशी दोन मुले आहेत.

Read More