Marathi News> मनोरंजन
Advertisement

हास्यजत्रा फेम मराठमोळी वनिता खरात कोणाच्या प्रेमात ? ..पोस्ट करून दिली प्रेमाची कबुली

तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानींमित्त तिने त्याच्यासोबतच एक सुंदर फोटो पोस्ट केला आणि त्याला शुभेच्छा दिल्या सोबतच प्रेमाची जाहीररीत्या कबुली सुद्धा दिली. 

हास्यजत्रा फेम मराठमोळी वनिता खरात कोणाच्या प्रेमात ? ..पोस्ट करून दिली प्रेमाची कबुली

Vaneeta kharat in love: सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु झाली आहे  आहे . दिवाळी काही दिवसांवर आलीये, तुलसी विवाहानंतर (tulasivivah)  (diwali) लग्नाचे मुहूर्त काढले जातात. अनेक जण लग्नाची शॉपिंग (wedding shopping) तयारीमध्ये व्यस्त असतील अनेकांनी प्लॅनिंग सुद्धा केलं असेल.. यात कलाविश्व सुद्धा मागे नाहीये. मराठी सिनेसृष्टीतून लग्नाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. नुकतेच आपण पाहिलं मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने मोठा वाजत गाजत साखरपुडा उरकला (bhagyashri mote engagement) तिच्या साखरपुड्याला हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद (hrithik roshan saba azad) ने सुद्धा हजेरी लावली होती. 

आणखी वाचा: तुमची इस्ञीही गंजलीये का? या सोप्या पद्धतीनं काही मिनिटांत करा चकाचक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी राणा दा आणि पाठक  बाई  म्हणजेच हार्दिक जोशी  (hardik joshi) आणि अक्षया देवधर (akshya deodhar) यांनी देखील साखरपुडा केला आणि लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत (akshaya deodhar hardik joshi engagm) . त्यांच्या चाहत्यांना लग्नाची खूप उत्सुकता लागून राहिलेय. 

आणखी वाचा: दे दणादण ! मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी.. पाहा video

आता आणखी एक मराठी कलाकाराने आपल्या प्रेमाची जाहीररीत्या कबुली दिली आहे,  आणि हि कलाकार आहे कबीर सिंग  (kabir singhj)फेम  आणि महाराष्ट्राची हास्यजत्रेमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी वनिता खरात (vaneeta kharat in love)
होय वनिता खरातने आपल्या प्रेमची कबुली दिली आहे. तशी पोस्ट तिने सोशल मीडियावर (social media) पोस्ट केली आहे. या पोस्टवर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (maharashtrachi hasyajatra fame vanita kharat in love share boyfriend photo with romantic caption )

आणखी वाचा:सावधान ! नाकाबंदीत याच बाईक सर्वात आधी पकडल्या जातात, आताच पाहा

वनिता खरात ने मराठीत तर आपला नाव कमावलचं आहे पण त्याचसोबत हिंदीमध्ये सुद्धा वनिताने आपला झेंडा रोवलंय कबीर सिंग सिनेमात तिने छोटीशी भूमिका साकारली पण त्यातून ती खूप प्रसिद्ध झाली .  उत्तम अभिनय हाच कलाकाराचा खरा  दागिना असतो, मग त्याच्यासमोर  रंग रूप देहयष्टी  सगळं अगदी नथिंग असत हे वनिताने दाखवून दिलं. 
तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानींमित्त तिने त्याच्यासोबतच एक सुंदर फोटो पोस्ट केला आणि त्याला शुभेच्छा दिल्या सोबतच प्रेमाची जाहीररीत्या कबुली सुद्धा दिली. सध्या सर्व कलाकार मंडळी वनिताला शुभेच्छा देत आहेत आणि फॅन्स सुद्धा वनिताला खुपु खुश आहेत. (maharashtrachi hasyajatra fame vanita kharat in love share boyfriend photo with romantic caption ) 

Read More