Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिषा पटेलचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

मुंबई पोलिसांचा सतर्कतेचा इशारा 

अमिषा पटेलचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

मुंबई : बॉलिवूड कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. याबाबत कलाकार पोलिसांकडे तशी तक्रार देखील करतात. हॅकर्स सेलेब्सचे अकाऊंट्स यासाठी हॅक करतात कारण ते हॅक करणं अतिशय सोपं असतं. आणि कलाकार कायमच चर्चेत असतात. आता अभिनेत्री अमिषा पटेल हिचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक (Ameesha Patel Instagram Account Hack) झालं आहे.

अभिनेत्री अमिषा पटेल हिचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले होतं , मात्र मुंबई पोलिसांनी विक्रमी वेळेत ते अकाउंट रिकव्हर केलं असून जनतेने देखील सतर्क राहण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर सेलने केले आहे , इन्स्ताग्राम वर "Account will be suspended within 24 hours for violating Instagram’s Copyright Law”अश्या आशयाचा एक मेसेज अमिषा पटेल यांना आला होता . ह्या मेसेज सोबत Copyright Objection Form’हि लिंकही देण्यात आली होती.

हे सर्व इन्स्ताग्रामकडून आल्याचे भासवले जात होते ह्या लिंक वर क्लिक केलं असता अमिषा यांचे अकाउंट लॉक झालं हे काहीतरी वेगळं असल्याची शंका अमिषा पटेलला आली. अमिषाने त्वरित सायबर सेल कडे धाव घेतली .पोलिसांनी तपास सुरु केला असता लिंक नेदरलॅंड मधील होती तर IP ADDRESS हा तुर्कस्तान मधला होता. सायबर पोलिसांनी त्वरित कारवाई करत अमिषा पटेलचं अकाउंट रिकव्हर केलं. मात्र कोणतीही अनोळखी लिंक क्लिक करू नका असं आवाहन नागरिकांना केलं आहे. 

Read More