Marathi News> मनोरंजन
Advertisement

Roopa Ganguly: 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा तीन वेळा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; इतकी का खचली?

Roopa Ganguly : एखाद्या कलाकाराला (Celebrity) मिळणारी लोकप्रियता आणि प्रेक्षकांकडून त्यांना मिळणारं प्रेम पाहता त्याचा हेवा वाटणं स्वाभाविक आहे. पण, बाहेरून त्यांचं आयुष्य कितीही सुरेख आणि हवंहवंसं वाटत असलं, तरीही कलाकारांच्या वाट्याला येणारं दु:ख मात्र कायमच पडद्याआड राहतं. 

Roopa Ganguly: 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा तीन वेळा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; इतकी का खचली?

Roopa Ganguly : एखाद्या कलाकाराला (Celebrity) मिळणारी लोकप्रियता आणि प्रेक्षकांकडून त्यांना मिळणारं प्रेम पाहता त्याचा हेवा वाटणं स्वाभाविक आहे. पण, बाहेरून त्यांचं आयुष्य कितीही सुरेख आणि हवंहवंसं वाटत असलं, तरीही कलाकारांच्या वाट्याला येणारं दु:ख मात्र कायमच पडद्याआड राहतं. थोडक्यात कलाजगतातील बरीच मंडळी दुहेरी चेहऱ्यानं वावरत असतात.  'महाभारत' फेम अभिनेत्री रुपा गांगुलीसुद्धा (roopa ganguly ) याला अपवाद नाही. हे नाव पटकन लक्षात येणार नाही, पण  'महाभारतातील' द्रौपदी (Mahabharat)... म्हटलं तर तुमच्या लगेचच लक्षात येईल की आपण कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय. 

बीआर चोप्रा यांच्या  'महाभारत' या मालिकेमध्ये रुपा यांनी द्रौपदीची (Draupadi) भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनीही या भूमिकेला अमाप प्रेम दिलं. याव्यतिरिक्त 'प्यार के देवता', 'सौगंध', 'बर्फी', 'निश्चय' यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. पण, पैसा आणि प्रसिद्धी असूनही या अभिनेत्रीच्या आयुष्यात असणारी वादळं काही शमली नाहीत. 

तीन वेळा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न 

आयुष्यातील चढऊतार कोणालाच मुकले नाहीत. पण रुपा मात्र या चढऊतारांमुळंही थकल्या होत्या. अपयशी वैवाहिक नात्यामुळं त्यांच्या कामावर याचे थेप परिणाम होऊ लागले होते. इतकंच नव्हे तर, या साऱ्याचे परिणाम इतके वाईट होते की त्यांना नैराश्याचा सामना करावा लागला होता. जगण्याच्या या संघर्षात रुपा यांनी तिनदा टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. 

रुपा यांनी 1992 मध्ये इंजिनियर ध्रुब मुखर्जी यांच्याशी लग्नगाठ बांधली. या नात्यातून त्यांना एक मुलगाही झाला. पण, काही काळातच या नात्यामध्ये वादाच्या ठिणग्या पडू लागल्या. रुपाला मिळणारी लोकप्रियता, तिचा सामाजिक स्तर पाहता पतीच्या मनात काही संकुचित विचार येऊ लागले होते. 

लग्नाचं नातं वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण... 

रुपा यांच्या माहितीनुसार त्यांनी लग्नाचं हे नातं टिकून राहील यासाठी अनेक प्रयत्न केले. पण, ते सहज शक्य झालंच नाही. पुढे त्या एकट्या पडल्या, घरातच राहू लागल्या. कलाजगताशी असणारी सर्व नाती तोली. आर्थिकरित्यासुद्धा त्यांना पतीवरच अवलंबून राहावं लागत होतं. पण, पती मात्र मदतीचा हातही पुढे करत नव्हता. अखेर आर्थिक चणचण वाढतच गेली आणि यातूनच त्यांनी कलाजगतामध्ये पुनरागमन करण्याचा विचार केला. या सतच्या बोचऱ्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत त्यांनी सकारात्मकचेच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलं. प्रवास सोपा नव्हता, पण अशक्यही नव्हता. 

रुपा यांच्या आयुष्यातील या सर्व घडामोडी पाहचा, जगणं खरंच किती कठीण आहे त्यांच्यासाठी आणि तुमच्याआमच्यासाठीसुद्धा... हाच विचार मनात घर करतो. 

Read More