Marathi News> मनोरंजन
Advertisement

'माफ कर देना हर बार सही नहीं होता', 'बदला' सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित

'पिंक'फेम अभिनेत्री तापसी पन्नू आणि जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'बदला' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'बदला' सिनेमा एका रहस्यमय कथेवर आधारलेला आहे. 

'माफ कर देना हर बार सही नहीं होता', 'बदला' सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : 'पिंक'फेम अभिनेत्री तापसी पन्नू आणि जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'बदला' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'बदला' सिनेमा एका रहस्यमय कथेवर आधारलेला आहे. सिनेमाच्या कथेत एका खूनचे रहस्य दडलेले आहे आणि या खुनामागे लपलेल्या गुढतेचे निराकरण करण्याची जबाबदारी अमिताभ बच्चन यांची आहे. बदला सिनेमात अमिताभ बच्चन एका वकीलाची भूमिका साकारणार आहेत. या आधी 'पिंक' सिमेमात बच्चन यांनी वकीलाची भूमिका बजावली होती. 

'बदला' सिनेमाची कथा उद्योजक महिला नयनाच्या जीवनावर आधारलेली आहे. हॉटेलमध्ये नयना तिच्या प्रियकराच्या मृतदेहासोबत बंद खोलीत आढळते. तेव्हा नयना स्वत:ला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी एका प्रतिष्ठित वकिलाची निवड करते. वकील आणि नयना सत्याचा शोध घेताना दिसत आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. सिनेमा 8 मार्च रोजी सिनमागृहात दाखल होणार आहे.

'माफ कर देना हर बार सही नहीं होता' अशी टॅग लाइन असलेला 'बदला' सिनेमा गौरी खान, सुनीर खेत्रपाल आणि अक्षय पुरी यांनी 'रेड चिली एन्टरटेन्मेट' बॅनरखाली निर्मित केला आहे. 'बदला' सिनेमा 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या 'कॉन्ट्राटिएम्पो' या स्पॅनिश सिनेमाची रिमेक असणार आहे.

Read More