Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक : पद्मावत सिनेमांतील ज्या खलनायकाला करणी सेना विरोध करतेय तो खिलजी MPच्या पुस्तकात हिरो

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमावरील वाद अजूनही गाजत आहे. 

धक्कादायक : पद्मावत सिनेमांतील ज्या खलनायकाला करणी सेना विरोध करतेय तो खिलजी MPच्या पुस्तकात हिरो

मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमावरील वाद अजूनही गाजत आहे. 

पद्मावत या सिनेमातील खलनायक अल्लउद्दीन खिलजीला करणी सेनेकडून कडाडून विरोध झाला. तर दुसरीकडे मध्य प्रदेशच्या पाठ्यपुस्तकात हिरो म्हणून खिलजीचा धडा शिकविला जात आहे. देशात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळत आहे. 

12 वीच्या पुस्तकांत खिलजीची शौर्य गाथा शिकविली जात आहे. पाठ्यपुस्तकात खिलजीची युद्धनिती आणि बाजार नियंत्रणाचे धडे दिले जात आहे. पाठ्यपुस्तकाच्या 334 पानावर खिलजीला वीर असं संबोधलं आहे. विद्यार्थ्यांना शिकविले जात आहेत की, अल्लाउद्दीन खिलजीने चितोडवर आक्रमण करून खिलजीने आरश्यामध्ये राणी पद्मावतीची झलक पाहिली.

fallbacks

fallbacks

fallbacks

fallbacks

या पुस्तकांना आता कडाडून विरोध होत आहे. राजपूत समाज या पुस्तकांना जाळणार आहे. क्षत्रिय महासभेचे महामंत्री यांनी सांगितले की, पुस्तकाच्या लेखकाला राजपूत समाज कोर्टात खेचणार आहे. तर मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री विजय शाह यांना विचारले असता त्यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. 

 

Read More